आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Elections 2015: BJP May Touch Majority Mark, Say Surveys

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींची प्रतिष्ठा पणाला; पीएमची नव्हे, सीएमची निवडणूक : भाजप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे बदलते चित्र पाहून भाजप खडबडून जागा झाला आहे. आतापर्यंत ‘व्होट फॉर मोदी’चा नारा देणाऱ्या भाजपला बुधवारी मोदींचा बचाव करावा लागला. लोकांना मुख्यमंत्री निवडायचा आहे, पंतप्रधान नव्हे, असे सांगत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ही भाजपविरुद्ध अन्य पक्षांची निवडणूक असल्याचेही सांगितले. दिल्लीतील प्रचार एक दिवस उरला आहे. त्यामुळे बुधवारी भाजप, आप आणि काँग्रेसने पूर्ण ताकद लावली. गुरुवारी पाच वाजता प्रचार संपणार आहे.

ईशान्येतील जनतेची भाजपने मागितली माफी
व्हिजन डॉक्युमेंटमध्ये ईशान्येच्या लोकांना ‘मायग्रेट’ म्हटल्याबद्दल भाजपने माफी मागितली. दिल्ली भाजप अध्यक्ष सतीश उपाध्याय म्हणाले, ‘हा मुद्रणदाेष आहे. आम्ही त्यासाठी विनाअट माफी मागत आहोत.’

दरम्यान, भाजपच्या भूमिकेविरुद्ध आसामसह ईशान्येतील अनेक राज्यांत लोकांनी निदर्शने केली. मोदींचे पुतळे जाळले. मोदींनी मात्र हा काँग्रेसचा डाव असल्याचे म्हटले.

पुढे वाचा, गप्पा मेक इन इंडियाच्या, सूट मात्र मेड इन ब्रिटन...