दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून दररोज होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे ही निवडणूक आणखीनच रोचक झाली आहे. भाजपकडून किरण बेदी यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा करण्यात आल्यामुळे दिल्लीतील निवडणूक लढाई अरविंद
केजरीवाल विरुद्ध किरण बेदी अशी झाली आहे. परंतु भारतीय जनता पक्षाने किरण बेदी यांना
अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मैदानात उतरवले नाही.