आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Elections: Kejriwal Has Less Asset, But Many Court Cases

दिल्लीचे तख्त: केजरीवालांकडे संपत्ती कमी, कोर्टकज्जेच जास्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सा-या देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली निवडणुकीतील आम आदमी पार्टीचे संयोजक तथा उमेदवार अरविंद केजरीवाल यांची संपत्ती जाहीर झाली. २.०९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात पत्नीचाही वाटा आहे; परंतु संपत्तीच्या तुलनेत त्यांच्यावरील कोर्टकज्ज्यांची संख्याच अधिक असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, केजरीवाल यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमध्ये केजरीवाल यांनी आपल्या संपत्तीचा तपशील मांडला आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या केजरीवाल यांच्याकडे ५ लाख रुपये, पत्नी सुनीता यांचे दागिने (९ लाख) व जंगम मालमत्ता ( १५.२८ लाख रुपये) अशी मिळून दोन कोटी एवढी संपत्ती आहे. त्यांच्या नावावर दोन फ्लॅट आहेत. गाझियाबाद, सिवनी (हरियाणा) येथे हे फ्लॅट असून त्याची किंमत अनुक्रमे ५५ लाख आणि ३७ लाख रुपये आहे. पत्नीच्या नावावर गुडगावमध्ये १ कोटी रुपयांचा फ्लॅट आहे. आपल्यावर १० खटले सुरू आहेत. ते न्यायप्रविष्ट आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर सात खटले होते. केजरीवाल यांनी शपथपत्राद्वारे ही माहिती दिली. केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्याने त्यांना अर्ज दाखल करता आला नव्हता. दुसरीकडे कृष्णानगर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांनी दुपारी बाराच्या सुमारास अर्ज दाखल केला.


भाजपत दुफळी नाही, निवडणुका एकजुटीने लढवणार : राजनाथ
किरण बेदींना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केल्यावर दिल्ली भाजपत बंडखोरी वा कोणताही कलह नाही. दिल्ली भाजप एकजुटीने या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी लढणार असल्याचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दिल्ली भाजपतील काही नेते व त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. बेदींचे नाव जाहीर झाल्यावर भाजपच्या दिल्ली पक्ष कार्यालयातही उद्रेक झाला होता. काही स्थानिक पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांनी आपली तक्रार नेतृत्वाकडे नोंदवावी, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. या मुद्द्याला अतिरंजित करण्याची गरज नाही, असे राजनाथ पत्रकारांशी बोलताना म्हणाले. बुधवारी राजनाथ सिंह यांनी माध्यमांना हे स्पष्टीकरण दिले आहे.
पुढे वाचा हजारेंविषयी माकन काय म्हणतात आणि बेदींची आहे पुण्‍यात जमीन...