आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Gang Rape All 3 Accused Sentenced To Death

\'निर्भया\'ला मिळाला न्याय: अपहरण, गॅंगरेप आणि हत्येप्रकरणी तिघांना फाशी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली फास्ट ट्रॅक कोर्टाने 19 वर्षीय 'निर्भया'ला आज (बुधवारी) न्याय दिला. छावला येथून अपहरण करून आणलेल्या एक तरुणीचे सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या तिन्ही नराधमांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. कोर्टाने 13 फेब्रुवारीला आरोपी रवी, राहुल आणि विनोद या तिघांना दोषी ठरवले होते.

मिळालेल्या माहिती नुसार, अपहरण, गॅंगरेप आणि हत्येची घटना 2012मध्ये हरियाणात घडली होती. त‍िन्ही नराधमांनी नजफगडजवळ एका बस स्टॉपवरून पीडितेचे अपहरण केले होते. तिघेही तिच्या ऑफिसात काम करत होते.

अपहरण केल्यानंतर तिला गुडगाव येथे नेऊन तिच्यावर तिघांनी पाशवी सामुहीक बलात्कार केला होता. तिच्या सर्वांगाला सिगारेटचे चटके दिले होते. एवढेच नाही तर तिच्या गुप्तांगात दारुची बाटलीही त्यांनी घातली होती. नंतर तिची हत्या करून मृतदेह रेवाडी परिसरात फेकून दिला होता.

तिन्ही आरोपींनी केलेला गुन्हा 'रेयरेस्ट ऑफ रेयर' असून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकील सतविंदर कौर यांनी कोर्टात केली होती. बचाव पक्षाने आरोपींना आजीवन कारावासाच्या शिक्षेची मागणी केली होती.

पीडितेच्या कुटूंबियांनी जवळपास एक वर्ष जंतर- मंतरवर उपोषण केले होते. नराधमांना मृत्युदंडची शिक्षा व्हावी,अशी मागणी केली होती. पीडितेच्या कुटुंबियांना आज अखेर न्याय मिळाला.