आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Gang Rape: All Four Convicts Face Life Or Death Today

\'दामिनी\'ला न्यायाची आणखी वाट बघावी लागणार; नराधमांना फाशी की जन्मठेप?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या 16 डिसेंबरला राजधानी दिल्लीत धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामुहीक बलात्कारप्रकरणातील दोषींना आता शुक्रवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. तीन तासांपेक्षा जास्त वेळ चालेल्या चर्चेनंतर साकेत येथील जलदगती कोर्टाने हा निर्णय दिला. शुक्रवारी (ता.13) दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावली जाणार असल्याचे कोर्टाने सांगितले. कोर्टाने मंगळवारी आरोपी मुकेश शर्मा, विनय शर्मा, पवन गुप्‍ता उर्फ कालू आणि अक्षय ठाकूर यांना दोषी ठरवले होते. दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली.

साकेत कोर्टाने गुन्हेगारांच्या शिक्षेचा निर्णय आज (बुधवार) पुढे ढकलला. येत्या शुक्रवारी (ता. 13) दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आज (बुधवार) या चारही आरोपींना शिक्षा ठोठावली जाणार होती. चौघांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत असताना कोर्टाने शिक्षेचा निर्णय 13 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. कोर्टाने कुठलीही शिक्षा सुनावली तरी, या निर्णयाविरुद्ध उच्‍च न्‍यायालयात जाणार असल्‍याचे आरोपींच्‍या वकीलाने सांगितले आहे.

कायदेविषयक तज्ज्ञांच्या मते खून, गुन्हेगारी षडयंत्र, सामूहिक बलात्कार, अपहरण, अनैसर्गीक अत्याचार यासह अनेक गंभीर गुन्ह्यांत आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे चारही आरोपींना जास्तीत जास्त फाशीची आणि कमीत कमी जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे. भारतीय आणि परदेशातील प्रसार माध्यमांचीही नजर या निर्णयाकडे लागून राहिली असून देशातील जनताही या निर्णयाची अतूरतेने वाट पाहात आहे. न्यायालयाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार, अनैसर्गीक अत्याचार, खून, दरोडा, अपहरण यासह अकरा गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविले आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, आरोपी म्हणाले, आमचे वय पाहाता कमीत कमी शिक्षा द्या