आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Gang Rape Case: Delhi Police Arrest Two Person

\'आप\'च्या कायदा मंत्र्याने घेतले पीडित महिलेचे नाव, केजरीवाल सरकारविरोधात काँग्रेस रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डेन्मार्क महिला गँगरेप प्रकरणी आज (गुरुवार) काँग्रेस कार्यकर्ते अरविंद केजरीवाल सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंदरसिंग लव्हली यांनी केजरीवाल सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे. निर्भया गँगरेपनंतर रस्त्यावर उतरणारे केजरीवाल आता तोंडावर बोट ठेवून का आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दुसरीकडे, दिल्लीचे विधी व न्याय मंत्री सोमनाथ भारती यांनी डेन्मार्कची नागरिक असलेल्या पीडित महिलेची ओळख सार्वजनिक केली आहे. त्यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत महिलेचे नाव घेऊन नवा वाद ओढवून घेतला.

डेन्मार्कच्या 51 वर्षीय महिलेवरील झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी महेंद्र आणि राजा या दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर एका आरोपीने स्वतःची पँट पीडित महिलेला नेसवली होती. दुसरीकडे परदेशी महिलेवरील सामूहिक बलात्कारानंतर आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्ली पोलिस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रिपोर्ट करत नसल्याचे विश्वास म्हणाले आहेत.
याआधी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेपनंतर केजरीवाल आणि त्यांच्या टीमने महिला सुरक्षेवरुन शीला दीक्षित यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल करत महिलांच्या सुरक्षेत दिल्ली सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले होते.

पुढील स्लाइडमध्ये, कॅनॉट प्लेसजवळ झाली घटना...