आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Gang rape News In Marathi, Supreme Court, Crime,

दामिनी प्रकरण: दोन नराधमांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन गुन्हेगार मुकेश सिंह आणि पवन गुप्ता यांच्या फाशीच्या शिक्षेला आज (शनिवार) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या निर्णयाने दामिनी प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम करीत चारही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा बजावली होती. या निर्णयाला मुकेश आणि पवन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने मुकेश आणि पवन यांची फाशीच्या शिक्षेला 31 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.
दामिनी सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाला दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्याचा दर्जा देत दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली न्यायालयाने चौघांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय कायम ठेवला होता. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रतिभा राणी आणि रेवा खेत्रापाल म्हणाले होते, की गुन्हेगारांना बजविण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेने समाजात एक संदेश जाईल. अशा स्वरूपाचा गुन्हा करण्यास पुन्हा कुणी धजावणार नाहीत.