आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली गॅंगरेप: आज शिक्षा; चारही नराधमांचा गुन्हा सिद्ध, फाशी की जन्मठेप?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गेल्‍या वर्षी डिसेंबरमध्‍ये नवी दिल्‍लीत झालेल्‍या सामुहिक बलात्‍कार प्रकरणी मंगळवारी साकेत सत्र कोर्टाने चारही आरोपींना दोषी ठरविण्‍यात आले आहे. न्‍यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दोषींच्या शिक्षेवर आज (बुधवार) सुनावणी असून दोन्‍ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्‍यानंतर शिक्षा ठोठावण्‍यात येणार आहे. याप्रकरणी मुकुश शर्मा, विनय शर्मा, पवन गुप्‍ता आणि अक्षय ठाकूर यांच्‍याविरुद्ध सुनावणी झाली. या निर्णयाविरुद्ध उच्‍च न्‍यायालयात जाणार असल्‍याचे आरोपींच्‍या वकीलाने सांगितले. तर दिल्‍ली पोलिसांनी समाधान व्‍यक्त केले.

एकूण 13 गुन्‍हे त्‍यांच्‍याविरुद्ध दाखल होते. सर्व गुन्‍ह्यांमध्‍ये त्‍यांना दोषी ठरविण्‍यात आले आहे. त्‍यात सामुहिक बलात्‍कार, बळजबरीने अनैसर्गिक शा‍रीरीक संबंध आणि हत्‍येचाही गुन्‍हा दाखल आहे. ज्‍या गुन्‍ह्यांखाली आरोपींना दोषी ठरविण्‍यात आले आहे, त्‍यात जन्‍मठेपेपासून मृत्‍यूदंडाचीही तरतूद आहे. त्‍यामुळे उद्या न्‍यायालयाकडून काय निर्णय देण्‍यात येतो, याकडे लक्ष लागले आहे.

दुपारी 12.30 वाजताच्‍या सुमारास न्‍यायालयाने निर्णय जाहीर केला. अतिरिक्त सत्र न्‍यायाधीश योगेश खन्ना यांच्‍यासमोर निर्णयाबाबत सुनावणी झाली. साकेत येथील न्‍यायालयात सुनावणी झाली. न्‍यायालयाबाहेर प्रचंड गर्दी झाली आहे. आरोपींना फाशी देण्‍याची मागणी करण्‍यात येत आहे. तिहार तुरुंगातून चारही आरोपींना सकाळी 10 वाजताच न्‍यायालयात आणण्‍यात आले.

सत्र न्‍यायालयात याप्रकरणाची सुनावणी गेल्‍याच आठवड्यात पूर्ण झाली होती. मुख्‍य आरोपी राम सिंह याचा तिहार तुरुंगात संशयास्‍पद मृत्‍यू झाला. तर एका अल्‍पवयीन आरोपीला बालन्‍यायालयाने 3 वर्षांची शिक्षा सुनावली. त्‍याची बालसुधारगृहात रवानगी करण्‍यात आली आहे.

सामुहिक बलात्‍कारानंतर 'दामिनी'वर भीषण अत्‍याचार करण्‍यात आले होते. अल्‍पवयीन गुन्‍हेगाराने तिच्‍यावर लोखंडी रॉडने अत्‍याचार केले होते. त्‍याच जखमांमुळे तिचा 29 डिसेंबरला सिंगापूर येथे मृत्‍यू झाला होता.