आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारगृहात चालतात फक्त ‘त्याचे’च नियम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील ‘मजनू का टिला’ येथील बाल सुधारगृहाची खोली. एक बिछाना. छतावर पंखा. केबल कनेक्शनसह टीव्ही. भिंतींवर चित्रपट अभिनेत्रींचे पोस्टर्स. इथेच राहतो दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील खतरनाक गुन्हेगार. तीन वर्षे तो इथेच राहणार आहे. इतर गुन्हेगारांसाठी सुधारगृहांचे नियम काहीही असोत, पण याने स्वत:चे नियम तयार केले आहेत. दिवसभर मनमर्जी, इतर कैद्यांसोबत मारामारी. रात्री टीव्हीवर चित्रपट आणि म्युझिक चॅनल पाहणे, हा त्याचा नित्यक्रम.
दिल्ली बलात्कारप्रकरणी त्याच्या इतर साथीदारांना फाशीची शिक्षा झाली. मात्र, गुन्हा घडण्याच्या वेळी त्याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी म्हणजेच साडेसतरा वर्षे होते, म्हणून त्याला फाशीची शिक्षा झाली नाही. त्याला तीन वर्षे बालसुधार गृहात राहण्याचे आदेश देण्यात आले. अटकेनंतर तो याच सुधारगृहात आहे. सुधारगृहाचे समाजकल्याण अधिकारी लवकुमार सांगतात, ‘सुरुवातीला तो थोडा शांत होता; पण जेव्हा त्याला कळले की, तो इथे फक्त आणखी दोन वर्षे, दोन महिने राहणार आहे, तेव्हापासून तो एकदम बदलला. तो
वाचत नाही ना खेळत नाही. सुधारगृहाच्या उपक्रमात भाग घेत नाही. फक्त टीव्ही पाहणे, आराम करणे, एवढेच करतो.’
उत्तर प्रदेशातील बदायू येथे जन्मलेल्या या गुन्हेगाराची सकाळ योगा व व्यायामाने होते. नाश्त्यात फळे आणि दूध असते. त्यानंतर एक शिक्षक येतात, ते फक्त त्यालाच शिकवतात. दुपारच्या जेवणात भात-भाजी-चपाती. थोडा आराम. नंतर खेळ. संध्याकाळी चहासोबत ब्रेड-बिस्किट. त्यानंतर व्होकेशनल ट्रेनिंग. रात्रीच्या जेवणानंतर दूध. रात्री टीव्ही व आरामात झोप. प्रत्येक शुक्रवारी खास जेवण व खीर. दर रविवारी दोन तास धार्मिक प्रवचन. ते त्याला अजिबात आवडत नाही.
आधी त्याला सहा बेडच्या हॉलमध्ये ठेवण्यात आले होते. तिथे तो रात्रभर टीव्ही पाहत होता. मित्रांनी तक्रार केली, तर त्यांना मारत असे. वैतागलेल्या सुधारगृहातील अधिकार्‍यांनी मुख्य गेटजवळील एका सेलमध्ये त्याला एकट्यालाच ठेवले. त्याची वर्तणूक पाहता टीव्ही फोडू नये म्हणून टीव्हीला लोखंडी जाळी करण्यात आली आहे.
लवकुमार सांगतात, ‘त्याची वागणूक सुधारण्यासाठी मानसशास्त्रीय प्रयोग सुरू आहेत; पण त्याच्यात काही सुधारणा नाही. मूड बिघडला, तर खेळाच्या मैदानात उतरतो; पण खेळण्यासाठी नाही, तर खेळणार्‍या मुलांसोबत भांडण करण्यासाठी. कारण काहीच नसते. तो कारण शोधत असतो. उद्धटपणा एवढा की, रोज सुधारगृहाबाहेरील रस्त्यावर दगड फेकत असतो. गेल्या आठवड्यात या दगडफेकीमुळे अनेकजण जखमी झाले.