आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली गँगरेपचा 10 सप्टेंबरला निकाल?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील पॅरामेडिकल विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली. मात्र, जलदगती न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आरोपींच्या शिक्षेची घोषणा 10 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी 16 सप्टेंबर रोजी अत्याचार करण्यात आलेल्या विद्यार्थिनीचा 29 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणातील 6 पैकी एका आरोपीने तुरुंगातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एका अल्पवयीन आरोपीस तीनच दिवसांपूर्वी तीन वर्षांची शिक्षा झालेली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांनी मंगळवारी प्रकरणातील अंतिम सुनावणी केली. विशेष सरकारी वकिलांनी सांगितले की, पीडितेचा जबाब, वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबान्यांवरून आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट होते.

याउलट बसमधील उपस्थितीमुळे आरोपी मुकेशला दोषी मानले जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवत पुढील सुनावणीसाठी 10 सप्टेंबरची तारीख निश्चित केली.

अवघ्या देशाला हादरवणार्‍या या प्रकरणात सरकारी वकिलांनी 5 साक्षीदारांची उलटतपासणी केली. आरोपी पक्षाने 17 साक्षीदार हजर केले. आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, लूट, पुरावे नष्ट करणे, गुन्हेगारी कट रचणे आदी आरोप आहेत. या प्रकरणात त्यांना फाशीचीही शिक्षा सुनावली जाऊ शकते.