आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालिमार मॅक्स हॉस्पिटलचा परवाना रद्द, जीवंत नवजात बाळाला केले होते मृत घोषित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीच्या शालिमार बागमधील मॅक्स हॉस्पिटलचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. दिल्ली सरकारने या प्रकरणी आलेल्या तपास अहवालानंतर हे कठोर पाऊल उचलले आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, अशाप्रकारे जीवंत बाळाला मृत जाहीर करण्यासारखे दुर्लक्ष कधीही स्वीकार्ह ठरू शकत नाही. 

 

हॉस्पिटलने गुरुवारील 22 आठवड्यांच्या नवजात अर्भकाला मृत घोषित करत त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणी दिल्ली मेडिकल असोसिएशन मॅक्स हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या पाठिशी आहे. दिल्ली मेडिकल असोसिएशनने म्हटले होते की, वेळेआधी होणाऱ्या प्रसुतींसाठी काहीही प्रोटोकॉल किंवा गाइडलाइन्स नाही. पण भारताचा कायदा 20 आठवड्यांपर्यंत गर्भपाताला परवानगी देतो. काही गंभीर प्रकरणांत  24 आठवड्यांतही गर्भपाताची परवानगी दिली आहे. म्हणजे भारतीय कायद्यानुसारही 24 आठवड्यांपर्यंतचे अर्भक जीवंत राहू शकत नाही, असे मान्य केले आहे. 

 

असोसिएशनच्या मते, 24 आठवड्यांपेक्षा लहान अर्भक असेल तर ते वाचण्याची शक्यता फार कमी असते. अनेकदा hypothermia मुळे हृदयाचे ठोकेच लक्षात येत नाहीत. किंवा ते परत सुरू होतात. अशा काही मोजक्या प्रकरणांपैकी एक सफदरजंगचे प्रकरण आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...