आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश पाळला नाही म्हणून केजरीवालांनी DM-SDM ना रात्रीतून केले सस्पेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे विभागाने अतिक्रमण केलेल्या झोपड्या पाडल्यानंतरची स्थिती. - Divya Marathi
रेल्वे विभागाने अतिक्रमण केलेल्या झोपड्या पाडल्यानंतरची स्थिती.
नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आदेश पाळला नाही म्हणून दिल्ली सरकारने एक डीएम, एसडीएम आणि एसई ला शनिवारी रात्रीतून सस्पेंड केले. रेल्वेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही पीडितांना मदत दिली नसल्याच्या आरोपावरून या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकरण
शनिवारी रात्री उशीरा केजरीवालांनी एका ट्विटद्वारे आरोप केला की, रेल्वे विभागाने शकूरबस्तीमध्ये 500 गरिबांच्या झोपडपट्ट्या तोडल्या. यावेळी पोलिसांनी लाठीचार्जही केला. यादरम्यान एका सहा महिन्याच्या चिमुरड्या मुलीचा मृत्यूदेखिल झाला. जेव्हा एसडीएमना पीडितांना मदत करण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनीही आदेश पाळले नाहीत. थंडीच्या काळात अशा प्रकारची कारवाई करणाऱ्याला देव कधीही क्षमा करणार नाही, असेही केजरीवाल म्हणाले. या संपूर्ण प्रकरणावरून केजरीवाल यांनी रात्रीतून अनेक ट्विट्स केले.

रेलमंत्र्यांना प्रकरणाची माहिती नाही
केजरीवाल रात्री उशीरा घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी पीडितांसाठी ब्लँकेट आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांनी अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई केल्याचा जोरदार विरोधही केला. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली तर त्यांना या प्रकरणात काहीही माहिती नव्हते, असेही ते म्हणाले.
मुलीच्या मृत्यूचा कारवाईची संबंध नाही
याठिकाणी केजरीवालांनी सहा महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पण त्या मुलीच्या मृत्यूचा आणि कारवाईचा संबंध नसल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. या मुलीचा मृत्यू सकाळी दहा वाजताच झाला होता. तसेच या झोपडपट्टी वासियांना अतिक्रमण हटवण्यासाठी 9 महिन्वायांपासून वारंवार नोटिसा देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
पुढे पाहा, केजरीवालांनी रात्रीतून केलेले ट्विट्स...
बातम्या आणखी आहेत...