आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Govt Informs Meena That He Cannot Join The Acb As There Is No Need

दिल्लीत नवी जंग : आता एसीबी प्रमुखांच्या नेमणुकीवरून वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो-अरविंद केजरीवाल आणि मुख्य सचिव केके शर्मा. - Divya Marathi
फाइल फोटो-अरविंद केजरीवाल आणि मुख्य सचिव केके शर्मा.
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये दररोज नवीन वाद उद््भवत आहे. दिल्ली सरकारच्या निर्देशावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २००२ च्या सीएनजी फिटनेस घोटाळ्याची नव्याने चौकशी सुरू केली आहे. मात्र, त्यामुळे वाद वाढला आहे. एसीबी प्रमुखाच्या नियुक्तीवर दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग समोरासमोर आले आहेत.
दिल्ली पोलिस सहआयुक्त एम. के. मीणा यांना एसीबी प्रमुख नियुक्त करण्याची अधिसूचना गृह सचिव धरमपाल यांच्या स्वाक्षरीने केली होती. यामुळे नाराज राज्य सरकारने धरमपाल यांची बदली केली. नियुक्ती आदेशही माघारी घेतला आहे. यावर केंद्र म्हणाले, दिल्ली सरकारला धरमपाल यांची बदली करण्याचा अधिकार नाही. नायब राज्यपालांनी सरकारचा हा प्रस्ताव ठोकरला आहे.
दुसरीकडे, मीणा स्वत:ला एसीबीचे प्रमुख मानत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सक्षम अधिकाऱ्याने नियुक्ती केली आहे. सीएनजी घोटाळ्यात अडकलेल्या या अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या निर्णयाचे नजीब जंग यांनी समर्थन केले आहे. न्या. मुकुल मुदगल चौकशी अहवालाच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर हक्क सांगत बिहारसह अन्य राज्यांतील पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी चांगलाच झटका बसला. प्रशासनात आता सहआयुक्त पदाची निर्मिती करून मीणा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.

एसीबीमध्ये आतापर्यंत प्रमुख राहिलेले अतिरिक्त पोलिस आयुक्त एस. एस. यादव यांना एम. के. मीणांना रिपोर्ट करण्यास सांगितले आहे.
केजरीवाल यांनी एसीबी दिल्ली सरकारच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचा दावा करत बिहारसह अन्य राज्यांतील पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी केली हाेती. यावर बिहार सरकारकडून एक डीएसपी आणि तीन निरीक्षकांना दिल्ली सरकारमध्ये पाठवण्यात आले होते.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या सात निरीक्षकांची लाचलुचपत प्रतिबंधक शाखेत बदली करण्यात आली आहे
आपचा संताप...
{ दिल्ली सरकारने मीणा यांना एसीबी प्रमुख नियुक्ती करणाऱ्या गृह सचिवास हटवले.
{ मीणा म्हणाले : माझ्या नियुक्तीचा आदेश सक्षम अधिकाऱ्याकडून, मीच एसीबीचा अध्यक्ष.