आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Govt Orders FIR Against Sheila Dikshit In Delhi CWG Scam

\'आप\'कडून पुन्हा भ्रष्टाचाराचे राजकारण; कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झालेल्या राष्ट्रकुल खेळासंबंधीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली सरकारने भ्रष्टाचार विरोधी संस्थेकडून राष्ट्रकुल खेळांच्या योजनांमध्ये झालेल्या अनियमीततेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शीला दीक्षित यांच्या विरोधात थेट तक्रार नाही, मात्र एफआयआरमध्ये त्यांचे नाव येण्याची शक्यता आहे.
2010 मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल खेळांदरम्यान दिल्लीत स्ट्रीट लाइट खरेदी करण्यात आले होते. त्यात अनियमीतता झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्याचे नाव समोर आले होते. या खरेदीत सरकारचा 92 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप आहे. या योजनेला शीला दीक्षित यांनी मंजूरी दिली होती.
सुत्रांची माहिती आहे, की शहरविकास मंत्री मनिष सिसोदिया यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना यासंबंधीचा अहवाल दिला आहे. त्यावर केजरीवाल यांनी गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांच्या कारभाराची चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते.