आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम-विषम फॉर्मुला 15 दिवस लागू करण्‍याची काय गरज होती, HC चा प्रश्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाढते प्रदूषण कमी करण्‍यासाठी दिल्ली सरकारने प्रायोगिक तत्‍त्‍वावर 15 दिवसांसाठी सम आणि विषम फॉर्मुला लागू केला. परंतु, यामुळे प्रदूषण किती कमी झाले, याची माहिती घेण्‍यासाठी सहा दिवस पुरेसे आहेत. त्‍यामुळे 15 दिवसांसाठी हा फार्मुला लागू करण्‍याची काय गरज होती ?, असा प्रश्‍न दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने आज (बुधवार) विचारला. या बाबत दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

सहा दिवसांत का जमवली नाही माहिती...
- हा फॉर्मुला लागू होऊन सहा दिवस झाले. मात्र, आतापर्यंत माहिती का गोळा केली नाही, असे न्‍यायालयाने विचारले.
- प्रदूषणाबाबत 8 जानेवारीपर्यंत माहिती गोळा करून न्‍यायालयाकडे त्‍याचा अहवाल सादर करण्‍याचेही आदेश न्‍यायालयाने दिले.
- सम- विषम फॉर्मुला लागू झाल्‍यानंतर प्रदूषण किती कमी झाले, याची माहिती मागितली.
- सरकारने हा फॉर्मुला प्रायोगिक तत्‍वावर राबवला आहे. अजून दोन दिवस तो चालवता येऊ शकतो.
- या योजनेला सरकारने जास्‍त काळ चालवले तर नागरिकांची गैरसोय होईल.
- यामुळे प्रदूषण किती कमी झाले, याची माहिती घेण्‍यासाठी सहा दिवस पुरेसे आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटो....