आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्ट म्हणाले, केजरीवालांनी आधी \'ठुल्ला\' या शब्दाचा अर्थ समजावून सांगावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हायकोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चांगलेच खडसावले आहे. केजरीवाल यांनी वापरलेल्या कथित 'ठुल्ला' या शब्दाचा अर्थ आधी समजावून सांगावा. यापूर्वी आम्ही शब्द कधी पाहिला नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांच्या विरोधात एका पोलिस कॉन्स्टेबलने तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत कनिष्ठ कोर्टाने मानहानीच्या आरोपाखाली केजरीवाल यांना समन्स बजावले होते. तसेच पुढील सुनावणीला हजर राहाण्याचे आदेश दिले होते. हार्यकोर्टाने कनिष्ठ कोर्टाने दिलेला रद्द केला आहे.

21 पर्यंतच्या सुनावणीला मुख्यमंत्र्यांना सूट...
- कनिष्ठ कोर्टाने प्रथम दर्शनी केजरीवाल यांना दोषी मानले होते. परिणामी कोर्टाने केजरीवाल यांना 14 जुलैला होणार्‍या सुनावणीला हजर राहाण्यासाठी समन्स बजावले होते.
- केजरीवाल यांनी समन्सला अाव्हान देण्यासाठी व आदेश रद्द करण्‍यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती.
- याचि‍केवर न्यायाधीश मुक्ता गुप्ता यांच्या कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने केजरीवाल यांना दिलासा दिला आहे. कोर्टाने केजरीवाल यांना 21 ऑगस्टपर्यंतच्या सुनावणीला अनुपस्थित राहण्याची सूट दिली आहे.

'ठुल्ला' शब्दाचा अर्थ समजावून सांगावा- कोर्ट
- हायकोर्टने म्हटले की, केजरीवाल यांनी वापरलेला कथित 'ठुल्ला' शब्दाचा अर्थ आधी कोर्टाला समजावून सांगावा. कोर्टाने हा शब्द यापूर्वी कधी पाहिला नाही. यासाठी केजरीवाल यांनी तयार राहावे.
- न्यायाधीश म्हणाले, केजरीवाल यांनी हा शब्दप्रयोग केला आहे, तर त्यांना या शब्दाचा अर्थ माहीत असेलच.
- कोर्टाने तक्रारदार कॉन्स्टेबल अजयकुमार तनेजा यांना नोटिस बजावली आहे. मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीबाबत प्रत्युत्तर मागितले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाला तक्रारकर्ता पोलिस कॉन्स्टेबल?
बातम्या आणखी आहेत...