आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi HC Dismisses Somnath Bharti's Anticipatory Bail Plea

जमीन अर्ज फेटाळल्यानंतर घरी पोहोचले दिल्ली पोलिस, सोमनाथ भारती फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे आमदार आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांचा अंतरीम जामीन अर्ज मंगळवारी दिल्ली हायकोर्टाने फेटाळला आहे. आता त्यांची अटक अटळ मानली जात आहे. दिल्ली पोलिस त्यांच्या ऑफिस आणि घरी गेले मात्र ते कुठेच सापडले नाही. दुसरीकडे सोमनाथ भारतींनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे. भारती यांच्या पत्नीने केलेल्या आरोपानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सुप्रीम कोर्टात सुनावणी होत नाही तोपर्यंत समोर येणार नाही
भारती यांनी एका न्यूज चॅनलला सांगितले, 'मी तोपर्यंत समोर येणार नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्टात माझ्या याचिकेवर सुनावणी होत नाही. माझे पोलिसांना आवाहन आहे, की त्यांनी मला अटक न करता चौकशी करावी. या प्रकरणात मला पुरावे सादर करण्याची संधी दिली जावी. तशी संधी मला मिळाली तर माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहिन असल्याचे दाखवून देईल. पोलिस सूड भावनेने माझ्याविरोधात काम करत आहेत.'
काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने भारती यांच्या अटकेला स्थगिती दिली होती तेव्हा ते समोर आले होते. द्वारका नॉर्थ पोलिस स्टेशनमध्ये ते आले होते. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा कुत्रा होता. ते म्हणाले होते, 'मी पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्यास तयार आहे. त्यांनी या प्रकरणात कुत्र्याचा ताबा मागितला होता, मी त्याला घेऊन आलो आहे. त्यांनी त्याला ठेवून घ्यावे.'
पत्नीने दिली तक्रार
आमदार सोमनाथ भारतींविरोधात त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसा आणि मारहाणीची तक्रार दिली आहे. त्यांची पत्नी लिपिकाचा आरोप आहे, की मी गर्भवती असताना भारती त्यांच्या पाळीव कुत्र्याला माझ्या अंगावर सोडत होते. तो मला चावे घेत होता. भारतींवर ज्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो अजामीनपात्र आहे.