आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘यंग इंडिया’ विरोधात आयकर तपास स्थगितीस नकार; राहुल, सोनिया गांधींच्या चौकशीची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नॅशनल हेरॉल्डप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी यंग इंडिया लिमिटेडच्या विरोधातील आयकर तपासाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी कंपनीचे मोठे भागीदार आहेत. आता आयकर विभाग उभय नेत्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.  

काँग्रेसचे प्रवक्ते व ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामीने सोनिया व राहुल गांधी यांच्यावर नॅशनल हेरॉल्डची ५ हजार कोटी रुपयांची संपत्ती हडपल्याचा आरोप केला होता. पटियाला हाऊस कोर्टाने त्याच्या तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर यंग इंडिया कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल करून आयकरच्या नोटिसीला स्थगित करण्याची विनंती केली होती.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर व न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या पीठाने कंपनीला आयकरसंबंधी अधिकाऱ्याकडे जाण्यास सांगितले. सोनिया व राहुल हे दोघेही सध्या जामिनावर आहेत.  सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांच्या अडचणीत आगामी काळात वाढ होणार असल्याची चिन्हे आहेत. 
 
काय आहे प्रकरण 
-  भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप आहे की गांधी कुटुंब नॅशनल हेरॉल्ड वर मालकी दाखवून या वृत्तपत्राच्या  दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील इमारतीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. 
- दुसरीकडे, गांधी कुटुंबाचे म्हणणे आहे की त्यांना विनाकारण त्रास देण्यासाठी आणि सुड भावनेने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...