आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi HC Issues Notice To ArvindKejriwal On A Defamation Suit Of Rs One Crore

केजरींना एका दिवसात हायकोर्टाचे तीन झटके, बिन्नींना अपक्ष आमदार म्हणून मान्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी दिल्ली हायकोर्टाने एका पाठोपाठ एक असे तीन झटके दिले. फरीदाबादचे खासदार अवतारसिंग भडाना यांची मानहानी केल्याप्रकरणी नोटिसीची सुनवाणी करताना हायकोर्टाने केजरीवाल यांना नोटिस जारी केली. हायकोर्ट आता याप्रकरणी 6 मेला सुनावणी करेल. भडाना यांनी केजरीवालांविरूद्ध एक कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा केला आहे. आपल्याला माहित असेलच की, केजरीवाल यांनी 30 जानेवारीला एका जनसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना भ्रष्ट म्हणत त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन केले होते.
दुस-या एका घटनेत हायकोर्टाने वीज बिलात 50 टक्के सूट देण्याबाबत दिल्ली सरकारकडे उत्तर मागितले आहे. कोर्टने याबाबत सवाल करताना म्हटले आहे की, ही घोषणा सरकारने कोणत्या आधारावर केली. हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला होता की विधानसभेत घेतला होता. याबाबत येत्या शुक्रवारपर्यंत उत्तर द्यावे. याचबरोबर वीज बिलात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय स्थगित करावा. केजरीवाल यांच्या सरकारने 24 हजार घरगुती वीज ग्राहकांना ऑक्टोबर 2012 ते मे 2013 पर्यंत एकूण वीज बिलाच्या 50 टक्के सूट देण्याचा व त्यावरील दंड माफ करण्याचा निर्णय घेतला होता.
तिस-या घटनेत हायकोर्टाने विनोदकुमार बिन्नी यांच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत त्यांना अपक्ष म्हणून मान्यता दिली आहे. बिन्नीने याचिकेत म्हटले आहे की, आपचा व्हिप मानणे बंधनकारक आहे हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय रद्दबादल करावा. हायकोर्टाने हा निर्णय दिल्याने आपच्या आमदारांची संख्या आता 27 झाली आहे.