आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi HC Seeks Response From MTNL After Employee Complains Of Sexual Harassment

सरकारी कार्यालयात पोर्न वेबसाईट पाहण्यासाठी महिलेवर बळजबरी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारी कर्मचार्‍यांच्या कामचूकारपणाचे किस्से तुम्ही खूप ऐकले असतील मात्र, देशाची राजधानी दिल्लीतील एमटीएनएलच्या कार्यालयात अश्लिल वेबसाईट पाहण्याचे प्रकरण समोर आले आहे. गोष्ट एवढीच असती तर ठीक होते मात्र, पुरूष कर्मचार्‍यांनी कार्यालयातील महिलेवर वेबसाईट पाहण्यासाठी दबाव टाकला आहे. या प्रकरणी कार्यालयात न्याय न मिळाल्याने महिलेने हायकोर्टाचे दार ठोठावले आहे.
दिल्ली हायकोर्टाने टेलिकॉम कंपनी एमटीएनएलकडे लैंगिक शोषणाच्या या तक्रारीबद्दल खुलासा मागितला आहे. तक्रारदार ही एमटीएनएल कंपनीची महिला कर्मचारी असून त्यांनी त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार त्यांच्या कार्यालयातील पुरूष अश्लिल वेबसाईट पाहात असतात आणि महिलांनीही त्या पाहाव्या यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत असतात.