Home | National | Delhi | Delhi High Court Asks Navy Consider Transgender For Alternate Job

नौदलातून बडतर्फ करण्यात आलेल्या तृतीयपंथीयाचा दुसऱ्या नोकरीसाठी विचार करावा: हायकोर्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 30, 2017, 09:42 PM IST

नौदलातून बडतर्फ करण्यात आलेल्या तृतीयपंथीयाचा दुसऱ्या नोकरीसाठी विचार करावा असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. मनीषकुमार

 • Delhi High Court Asks Navy Consider Transgender For Alternate Job
  मनीष उर्फ सबी यांचे म्हणणे आहे की, त्यांना त्या एक महिला आहेत, असे वाटते (फाईल फोटो)
  नवी दिल्ली- नौदलातून बडतर्फ करण्यात आलेल्या तृतीयपंथीयाचा दुसऱ्या नोकरीसाठी विचार करावा असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. मनीषकुमार गिरी हे नौदलात सेलरच्या पदावर कार्यरत होते. त्यांनी गतवर्ष लिंगबदल केला होता आणि स्वत:चे नाव सबी ठेवले होते. त्यानंतर नौदलाने त्यांना हे पद महिलांसाठी नसल्याचे सांगत पदावरुन बरखास्त केले होते. कोर्टाने या विषयावर पुढील सुनवाई 23 नोव्हेंबरला ठेवली आहे.
  - जस्टिस जी. एस. सिस्तानी आणि व्ही. के. राव यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एसएसजी) संजय जैन यांना सल्ला दिला की, तुम्ही त्यांना नियमांचे पालन न केल्याबद्दल शिक्षा देऊ शकता, पण तुम्ही त्याला सामावूनही घेऊ शकता. एसएसजी जैन हे केंद्र सरकार आणि नौदलाकडून नियुक्त झाले होते.
  - खंडपीठ म्हणाले की, लष्करात अशी घटना पहिल्यादाच घडली आहे. नौदल म्हणाले की, तृतीयपंथीयास दुसरी नोकरी देण्याबाबतही विचार करावा.
  परिस्थिती धोकादायक झाली असती
  - खंडपीठ म्हणाले, यावर वेगळ्या दृष्टीकोनातुन विचार होऊ शकतो. ही घटना पहिल्यादाच घडली आहे. ही व्यक्ती आपल्या व्यक्तीमत्वाशीच झगडत होती. ते धोकादायक होते त्यामुळे याबाबत नीट विचार करावा.
  विचारांमध्ये बदल करण्याची गरज
  - न्यायालय म्हणाले की, परिस्थिती समजण्याची गरज आहे. या प्रकारची वैद्यकीय स्थिती लपवून ठेवता आली नसती.
  - कोर्टाने म्हटले आहे की, या व्यक्तीला अन्य नोकरी दिल्यास त्याच्या कुटुंबियांना बिकट परिस्थितीस सामोरे जावे लागणार नाही.
  पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 • Delhi High Court Asks Navy Consider Transgender For Alternate Job
  मनीष उर्फ सबीचे म्हणणे आहे की त्यांना लिंगबदलाबाबत डॉक्टरांनी सल्ला दिला होता.
 • Delhi High Court Asks Navy Consider Transgender For Alternate Job
  लिंगबदलानंतर मनीष उर्फ सबीने साडी घालण्याचा निर्णय घेतला.
 • Delhi High Court Asks Navy Consider Transgender For Alternate Job
  लिंगबदलापूर्वीचा मनीष आता सबा झाला आहे.
 • Delhi High Court Asks Navy Consider Transgender For Alternate Job
  लिंगबदलापू्र्वीचा मनीष.

Trending