आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मोकर सिध्द करुन तिघांना जन्मठेप, पोलिसांनी खोटे पुरावे जोडले, कटकारस्थान केल्याचा ठपका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हत्येच्या प्रकरणात खालच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यां तीन युवकांना दिल्ली उच्च न्यायालयाने मात्र निर्दोष सोडले. न्यायालयाने म्हटले की, खालच्या न्यायालयाने काही महत्वाचे पुरावे दुर्लक्षित केले. पोलीसांची कहाणी विश्वासाच्या योग्यतेची नव्हती. प्रबळ शक्यता तर ही आहे की, केस बनविण्यासाठी दिल्ली पोलीसांनी पुरावे नियोजिले (प्लांट) होते.

न्यायमूर्ती गीता मित्तल व न्यायमूर्ती अनु मल्होत्रा यांच्या पीठाने म्हटले की, मृत मुंन्शी यादव चे भाऊ रामा यादव यांनी म्हटले आहे की, त्यांचा भाऊ कधीही सिगारेट पीत नव्हता. दारुही कधीतरीच पीत होता. तेव्हा पोलीसांद्वारे सादर सिगरेटचे तुकड्यांवर मुंन्शीचे ठसे कसे काय आले? कोणी मरण्यापूर्वी सिगरेट का पिईल? पोलीसांची दारु पिल्याची थेअरी देखील फॉरेंन्सिक रिपोर्टने धुडकावली आहे. घटनास्थळावरुन जप्त केलेले ग्लासात दारु पिलीच गेली नाही. अशात पोलीसांवरच संशय येतो. पीठाने हे म्हटले आहे की, तपास अधिकाऱ्यांनी त्यांना सिगरेट पिण्यास मजबूर केले आणी उर्वरित तुकड्यांवर थुका लावण्यास सांगितले होते. न्यायमूर्ती मित्तल यांनी म्हटले आहे की, जिथून सिगारेटचे चार तुकडे मिळाले आहेत. तिथून काहीश्याच अंतरावर रिकामे ग्लास मिळाले आहेत. हे कसे शक्य आहे की, चार युवक एकाच जागी बसून सिगरेट पीऊन आणि मग काही अंतरावर जाऊन दारु पितील. या पुराव्यांच्या आधारावर आरोपींना दोषी ठरविता येत नाही. दिल्ली पोलीसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. पोलिसांनी असे खोटे पुरावे जोडून असे कारस्थान करायला नको होते. 
बातम्या आणखी आहेत...