आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi High Court News In Marathi, Shiv Sena, Divya Marathi

चपातीप्रकरण: शिवसेनेच्या खासदारांना अपात्र घोषित करण्याची याचिका न्यायालयांने फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्र सदनात रमजानच्या महिन्यात एका मुस्लिम कर्मचाऱ्याला बळजबरी खाऊ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या ११ खासदारांना अपात्र घोषित करण्याचे आदेश लोकसभा सभापती व राज्यसभेच्या अध्यक्षांना द्यावेत, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे.
मुख्य न्यायमूर्ती जी. रोहिणी आिण न्या. जयंत नाथ यांच्या न्यायपीठाने ही याचिका फेटाळताना म्हटले अाहे की, याचिकाकर्ता मौलाना अन्सार रझा यांनी ही जनहित याचिका आहे हे सिद्ध होऊ शकेल, असे पुरावे सादर केलेले नाहीत. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. तसेच गृह मंत्रालयानेही या प्रकाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ही याचिका फेटाळण्याची विनंती केंद्र सरकारच्या वतीने संजय जैन यांनी उच्च न्यायालयाला केली.

याचिकेत कारवाईची मागणी
१७ जुलै २०१४ रोजी खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र सदनात मिळत असलेल्या निकृष्ट जेवणाबद्दल तक्रार करून आयआरसीटीसीचा कर्मचारी अर्शद झुबेर याला बळजबरी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शिवसेनेच्या ११ खासदारांवर अपात्रतेची कारवाई करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.