आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi High Court Notice To CM Arvind Kejriwal And Law Minister Somnath Bharti

अरविंद केजरीवाल - सोमनाथ भारतींना दिल्ली हायकोर्टाची नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्यामागील शुक्लकाष्ट संपायचे नाव घेत नाही. विधानसभा निवडणूकीत निश्चित मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च केल्या प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने दोघांना उत्तर देण्यास सांगितले आहे. केजरीवाल आणि भारती यांच्या विरोधात पराभूत झालेले भारतीय जनता पक्षाच्या दोन उमेदवारांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज (मंगळवार) सुनावणी झाली. याचिकेत आरोप केला आहे, की केजरीवाल आणि भारती यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे आणि पुढील सहा वर्षे दोघांनाही निवडणूक लढविण्यापासून दूर ठेवण्यात यावे.
दिल्ली हायकोर्टाने नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवालांच्या विरोधात पराभूत झालेले भाजपचे उमेदवार विजेंद्र गु्प्ता आणि मालवीय नगर येथून पराभूत झालेल्या आरती मेहरा यांनी सोमनाथ भारती यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. कोर्टाने केजरीवाल आणि भारती यांना नोटीस जारी केले असून 25 फेब्रुवारी पर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एका उमेदवाराला 14 लाख रुपयांपर्यंत निवडणुकीत खर्च करण्याची मर्यादा आहे. दोन्ही याचिकार्त्यांच्या म्हणणे आहे, की 23 नोव्हेंबर 2013 रोजी जंतर-मंतर येथे झालेला रॉक शो 'जीत की गूंज-व्होट फॉर चेंज' या कार्यक्रमासाठी झालेला खर्च दोघांच्या निवडणूक खर्चात जोडावा.