आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांशी संबंधित याचिकेवर केंद्राला नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कायद्याचे कथितरीत्या उल्लंघन करून परदेशातून संपत्ती घेतल्याचा आरोप लावत दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे.
अधिवक्ता एम. व्ही. शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अतिरिक्त सॉलिसीटर राजीव मेहरा यांनी 23 ऑक्टोबरच्या आत उत्तर द्यावे, असा आदेश न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती व्ही. के. राव यांच्या पीठाने दिला आहे. याचिकेच्या काही तथ्यात्मक बाजूंवर काही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्यामुळे पुढच्या सुनावणीच्या आधीच केंद्राने खुलासा करावा, असेही न्यायालयाने सांगितले. याचिकेत नमूद मुद्द्यांची चौकशी करण्यात आल्याचे सरकारने न्यायालयास सांगितले.
या मुद्द्यावर एक अहवालसुद्धा तयार केला असल्याचे या याचिकेत सांगण्यात आल्यामुळे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.