आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याचा फोन! बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल, परिसरात हायअलर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याचा फोन कॉल आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच न्यायालयाच्या आवारात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात अतीदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
 
दिल्ली पोलिसांना गुरुवारी हायकोर्टात बॉम्ब असल्याचा फोन कॉल आला होता. त्याची गंभीर दखल घेत फायर ब्रिगेड, बॉम्ब स्क्वॉड आणि श्वान पथकासह स्वात टीमला घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. संभावित बॉम्बचा शोध सुरू आहे. 
 
 
सविस्तर वृत्त लवकरच... 
बातम्या आणखी आहेत...