आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅब सेवांवर बंदी नको: दिल्ली हायकोर्टाचे निर्देश, कर्मचाऱ्याने गुन्हा केल्यास कंपनी जबाबदार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अॅप्लिकेशनवर आधारित कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांवर बंदी घालू नये. एखाद्या कर्मचाऱ्याने गुन्हा केला तर त्यासाठी कंपनीला किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवता येणार नाही. तसेच, उबेर आणि ओला या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. अशा कॅबना परवाने देण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
उबेरवर बंदी घालण्याचा दिल्ली सरकारचा आदेश न्यायालयाने रद्दबातल ठरवला होता. याबाबत दिलेल्या निर्देशांमध्ये न्यायालयाने म्हटले आहे की, सरकारने परवान्यांसाठी करण्यात आलेल्या अर्जांचा पुनर्विचार करावा आणि कंपन्यांना नियमांत बसून कागदपत्रांची पूर्तता करता यावी म्हणून वेळ द्यावा. एखाद्या कंपनीवर पूर्णपणे बंदी योग्य होणार नाही. त्यामुळे अशा कंपन्यांना एक संधी देण्यात यावी, त्यांना परवाने देण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...