आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi High Court Orders Raj Thackreay Not To Comment On Bihari's

यूपी, बिहारींविरुद्ध राज यांनी शेरेबाजी करू नये, हायकोर्टाचा आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उत्तर प्रदेश, बिहारी नागरिकांविरुद्ध शेरेबाजी न करण्याचे आदेश गुरुवारी दिले. याशिवाय २०१२ मधील चिथावणीखोर भाषणप्रकरणी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला.

वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या राज्याच्या भाषेला प्रोत्साहन देण्यात गैर काहीच नाही. मात्र, हे करत असताना इतरांचे हक्कही अबाधित राहिले पाहिजेत, असे न्या. मनमोहन सिंग यांनी सांगितले. प्रत्येकाला स्वत:चे हक्क आहेत, त्यामुळे त्यांनी (ठाकरे) उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या नागरिकांविरुद्ध अशा गोष्टी करू नयेत.

राज ठाकरे यांच्या वतीने अॅड. अर्णभ चौधरी यांनी बाजू मांडली. आपल्या अशिलाविरुद्ध विविध गटांमध्ये वैमनस्य पसरलेल्या आरोपाखाली कलम १५३(अ) आणि १५३(ब) गुन्हा दाखल करण्याआधी दंडाधिकाऱ्यांनी कलम १९६ अंतर्गत केंद्र व राज्याची परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतरही दंडाधिकाऱ्यांनी तो फेटाळला आणि ठाकरेंविरुद्ध समन्स जारी केले. हे समन्स कायद्याच्या दृष्टीने अयोग्य असून त्यात अावश्यक नियमांचे पालनही करण्यात आले नसल्याचा दावा करण्यात आला. चौधरी यांनी आझाद मैदानावर राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण केले नसल्याचा दावा केला.