आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटलींच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली यांचे बँक खाते, कर भरणा व इतर आर्थिक नोंदींची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती; मात्र मानहानी संबंधीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.  

 जेटलींचे कुटुंबीय, त्यांच्या कंपन्यांचा आर्थिक तपशील जाहीर करण्यात यावा. जेटलींचे १० टक्क्यांहून अधिक भाग असलेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात यावी, अशी केजरीवालांनी याचिकेतून मागणी केली होती; परंतु त्याला ठोस आधार नसल्याचे कारण सांगून न्यायालयाने ती फेटाळली आहे. न्यायमूर्ती राजीव सहाय एन्डलॉ यांनी ही विनंती फेटाळली आहे. वकील अनुपम श्रीवास्तव यांनी केजरीवाल यांच्याकडून ही याचिका दाखल केली होती.   
बातम्या आणखी आहेत...