आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माता-पित्याची इच्छा असेपर्यंतच मुलगा घरी राहू शकतो : दिल्‍ली उच्‍च न्‍यायालय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विवाहित असो की अविवाहित, कोणताही मुलगा आई-वडिलांच्या घरी त्यांची इच्छा असेपर्यंतच राहू शकतो. हा मुलास मिळालेला कायदेशीर हक्क नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी एका खटल्याच्या सुनावणीत स्पष्ट केले. चांगले संबंध असेपर्यंत मुलास आपल्या घरात राहू देण्याचा अर्थ असा नव्हे की आई-वडिलांनी कायमस्वरूपी आपल्या पोटच्या मुलाचे ओझे वाहावे,असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

न्या. प्रतिभा राणी यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध दाखल अपील फेटाळत हा निर्वाळा दिला. एका बुजुर्ग दांपत्याने सत्र न्यायालयात मुले व सुनांविरुद्ध याचिका दाखल केली होती. आपल्या हक्काच्या घरात बळजबरीने राहणाऱ्या मुले व सुनांनी आपल्या आयुष्याचा नरक केला असल्याचे या आई-वडिलांनी याचिकेत म्हटले होते.

हे घर बांधताना आर्थिक सहकार्य केले होते. त्यामुळे या घरावर आपलाही तेवढाच हक्क असल्याचा दावा मुलांनी केला होता. सत्र न्यायालयाने बुजुर्ग दांपत्याच्या बाजूने हा निकाल देत मुले व सुनांना घर तत्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुले व सुना कोणताही ठोस पुरावा देऊ शकले नाहीत.
दुसरीकडे बुजुर्ग दांपत्याने दस्तऐवजांद्वारे घराची मालकी त्यांच्याकडेच असल्याचे सिद्ध केले, असे न्यायालयाने स्पष्ट केले. घरांबाबत कौटुंबिक वादांसंबंधी हा निकाल महत्त्वाचा ठरणारा आहे.
बातम्या आणखी आहेत...