आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजोनिवृत्त महिलेसोबत जबरदस्तीचा शारीरिक संबंध बलात्कार नव्हे, हायकोर्टाचा निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रजोनिवृत्त महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणे बलात्काराच्या श्रेणीत येत नसल्याचा धक्कादायक निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग व न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
60 वर्षाच्या महिलेवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील 49 वर्षीय आरोपी अच्छेलाल याची हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली. कनिष्ठ कोर्टाने अच्छेलाल याला दोषी ठरवले होते. तसेच त्याला 10 वर्षे कारावासाची शिक्षाही सुनावली होती. या निर्णयाला अच्छेलाल याने हायकोर्टात आव्हान दिले होते.

आरोपी अच्छेलालच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि मुक्ता गुप्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, अच्छेलाल बलात्काराचा दोषी आहे तर तो त्याला हत्येचा आरोपी म्हटले जावू शकत नाही, कारण त्याचा उद्देश नव्हता आणि त्याला हे माहितीही नव्हते अशाप्रकारे संबंधांनी महिलेचा मृत्यू होईल. भादंवि कलम 376 अंतर्गत महिलेचे वय 60 वर्षांहून अधिक होते आणि ते रजोनिवृत्तीच्या वयापेक्षा खूप जास्त आहे. याच आधारावर न्यायमूर्ती नंद्राजोग आणि मुक्ता गुप्ता यांनी बलात्काराचा आरोपी अच्छेलाल याची निर्दोष मुक्तता केली.