आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Hindu Mahasabha Activists Vandalise Pak International Airlines Office

पाक एअरलाइन्‍सच्‍या ऑफिसमध्‍ये हिंदू महासभेच्‍या कार्यकर्त्‍यांनी केली तोडफोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बाराखंभा रोडवरील पाकिस्‍तानच्‍या एअरलाइन्‍स कार्यालयात हिंदू सेनेच्‍या काही कार्यकर्त्‍यांनी तोडफोड केल्‍याची घटना समोर आली आहे. तोडफोड केली ते पाकिस्तानच्‍या आंतरराष्‍ट्रीय एअरलाइन्‍सचे कार्यालय आहे. या प्रकरणी हिंदू महासभेच्‍या एका कार्यकर्त्‍यांला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.
एयरलाइन्‍सच्‍या कार्यालयातील सुरक्षा वाढवली..
- हिंदू महासभा आणि हिंदू सेनेच्‍या कार्यकर्त्‍यांनी पाकविरोधात नारेबाजी करत एयरलाइन्‍सच्‍या ऑफिसमध्‍ये प्रवेश केला.
- ऑफिसमध्‍ये शिरल्‍यानंतर कार्यकर्त्‍यांनी तोडफोड करण्‍यास सुरूवात केली.
- प्रकरणाची माहिती मिळताच तत्‍काळ पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले.
- या प्रकरणी एका कार्यकर्त्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- दिल्ली पोलिसांनी एयरलाइन्‍स कार्यालयाची सुरक्षा वाढवली आहे.
हिंदू सेनेने दिले स्पष्‍टीकरण..
- हिंदू महासभा आणि हिंदू सेनेचे कार्यकर्ते पठाणकोट हल्‍ल्याचा विरोध करण्‍यासाठी पाकिस्तान एयरलाइन्‍सच्‍या कार्यालयात पोहोचले होते.
- हिंदू सेनेचे नेता विष्णू गुप्ता म्‍हणाले, हिंदू सेनेच्‍या लोकांनी कुठे बॉम्‍बस्‍फोट केला नाही. फक्‍त एक संगणक तोडला आहे.
- पाकिस्‍तान एअरलाइन्‍सचे कार्यालय बंद करावे, अशी आमची मागणी आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो...