आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत एक दिवसाआड चालवावी लागणार कार, प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील नागरिक एक जानेवारीपासून दररोज आपली कार चालवू शकणार नाहीत. प्रत्येक कारचा नंबर एक दिवसाआड येईल. दिल्लीच्या रस्त्यावर एक दिवस सम संख्या (शेवटी ०,२,४,६,८ आहे ) असलेली वाहने चालतील. दुसऱ्या दिवशी विषम संख्या (ज्यांच्या शेवटी १,३,५,७,९) असलेली वाहने चालतील. राजधानीतील प्रदूषण कमी करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हा नियम दिल्लीबरोबरच शेजारील राज्यांचा नोंदणी क्रमांक असलेल्या खासगी वाहनांनाही लागू असेल. आपत्कालीन सेवा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना या नियमाच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे दिल्लीत एकूण नोंदणीकृत खासगी गाड्यांपैकी रोज फक्त अर्ध्या गाड्याच रस्त्यावर उतरतील. दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारीच राजधानीतील वाढत्या प्रदूषणावरकठोर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ‘दिल्लीत राहणे हे आता गॅस चेम्बरमध्ये राहण्यासारखे झाले आहे,’असे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाच्या या कठोर टिप्पणीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव के. के. शर्मा यांनी सरकारच्या निर्णयाची घोषणा केली.

काँग्रेसचाविरोध योजना व्यवहार्य असावी - भाजप, : आपसरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे प्रवक्ता शकील अहमद म्हणाले, केजरीवाल सरकारला स्वस्त लोकप्रियतेसाठी नाटक करण्याची सवयच आहे. हा व्यावहारिक निर्णय नाही. त्यामुळे सामान्य माणसाची अडचण होईल. प्रकृती बिघडली तर रुग्णालयात जाण्यापूर्वी कारचा क्रमांक काय आहे हे पाहावे का?’ भाजपने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, प्रदूषण रोखण्याच्या कुठल्याही पावलाचे आम्ही स्वागतच करतो. पण ते व्यवहार्य असावे.’

कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ‘दिल्लीत राहणे हे आता गॅस चेम्बरमध्ये राहण्यासारखे झाले आहे,’असे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाच्या या कठोर टिप्पणीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव के. के. शर्मा यांनी सरकारच्या निर्णयाची घोषणा केली.

चीन, सिंगापूरमध्येही अशी योजना
सम/विषम संख्या असणारी ही योजना चीनची राजधानी बीजिंग आणि सिंगापूरमध्येही लागू आहे. तेथे एक दिवस सम संख्येची वाहने चालतात तर दुसऱ्या दिवशी विषम संख्येची. अशा पद्धतीने एक वाहन साधारणपणे १५/१६ दिवसच चालू शकते.