आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Jangpura MLA Constituency Praveen Deshmukh Is A Marathi Guy

पंक्चर काढणा-याचा मुलगा दिल्लीत \'आप\'चा झाला आमदार, जो आहे मराठी; वाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीतील जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आम आदमी (आप) पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आलेले प्रवीणकुमार देशमुख हे मूळचे भोपळचे असले तरी मराठी आहेत. अण्णा आंदोलनावेळी प्रविणने नोकरी सोडून दिली. त्यानंतर केजरीवाल यांनी आपची स्थापना केल्यानंतर प्रवीण आपमय झाला. दिल्लीत 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपसाठी प्रविणने जोरदार काम केले. त्यानंतर आपच्या पहिल्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री झालेल्या मनीष सिसोदिया यांचे ओएसडी म्हणून काम पाहिले आहे. प्रवीणकुमारने आपला विजय हा प्रामाणिक व सत्य याचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.
(छायाचित्र- दिल्लीतील प्रचारादरम्यान एका आजीसमवेत प्रविण देशमुख)
प्रवीणने टीआयटी कॉलेजमधून वर्ष 2008 मध्ये MBA केले आहे. भोपाळमधील अयोध्या बायपासजवळ प्रकाशनगर येथे त्यांचे कुटुंब राहते. एका चांगल्या नोकरीसाठी प्रविण दिल्लीत गेला होता. नोकरी चांगली मिळाली पण अण्णांच्या आंदोलनात सहभागी होत नोकरी सोडून दिली.
प्रवीणच्या वडिलांची पंक्चर काढण्याचे आहे दुकान-

प्रवीणचे वडील पी एन देशमुख भोपाळमधील एका पुलाच्या खाली टायर रिमोल्डिंग आणि पंक्चर काढण्याचे दुकान चालवतात. आता भोपाळमधील त्यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली आहे. प्रवीणचे आई-वडिल यांनी महिनाभर झाले दिल्लीत तळ ठोकला आहे. आता ते केजरीवाल यांचा शपथ ग्रहण समारंभ पूर्ण करून परतणार नाहीत.
साडेसहा लाखांची नोकरी सोडली-
दैनिक भास्कर डॉट कॉमशी बोलताना प्रवीण देशमुखने सांगितले की, अण्णांच्या आंदोलनावेळी मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत होतो. त्यावेळी आपले वार्षिक 6.5 लाख रुपये पॅकेज होते. मात्र, नोकरी सोडून केजरीवालांच्या इंडिया अगेंस्ट करप्शनसोबत जोडलो गेलो. यावेळी तिकीट मिळाले तर कोणताही विचार न करता लढलो. मध्यप्रदेशातील अनेक नेत्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मदत केल्याचे प्रविण सांगतो.
मंत्री बनणे लक्ष्य नाही-
केजरीवाल यांच्या नव्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळणार का याबाबत विचारले असता प्रविण म्हणाला, मंत्री करायचे की नाही याचा निर्णय पक्षाचा असेल. मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि सामान्य व्यक्ती म्हणूनच काम करू इच्छितो व राहू इच्छितो. प्रवीणकुमार आपचा एक संस्थापक सदस्य आहे व सध्या दिल्लीतील आप पक्षाचा उपाध्यक्ष आहे.
आपच्याच माजी नेत्यांना हरवले-
भाजपच्या एम एस धीर यांचा सुमारे 20 हजार 400 मतांनी पराभव केलेल्या प्रविणचे वय केवळ 30 वर्ष आहे. प्रवीणकुमारने दिल्लीतील खासगी बड्या शाळांत डोनेशन घेऊन प्रवेश देणाच्याविरोधात मोठी मोहिम राबवली होती. त्यामुळे प्रविणचे नाव घराघरात पोहचले. एम एस धीर हे मूळचे आम आदमी पक्षाचे नेते होते. केजरीवाल यांच्या 49 दिवसाच्या सरकारमध्ये धार विधानसभा अध्यक्ष होते. मात्र, त्यांनी नुकताच आपला सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. शाकाहारी असलेला व शाकाहारी होण्याबाबत मोहिम राबविणा-या प्रविण कुमारने एम्समध्ये आपले डोळे व शरीराचे इतर अवयव दान करण्याचा निश्चय केला आहे.
5 लाखाचा प्लॉट आणि 27 हजार रोकड-
प्रवीण कुमार याच्याकडे खूपच तोकडी संपत्ती आहे. त्याच्याकडे रोख 20 हजार रुपये आहेत. तर, 6 हजार रुपये वसंत कुंज येथील आयसीआयसीआय बॅंकेत तर भोपाळमधील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया यात 1 हजार रुपये जमा आहेत. 2 लाख रुपयाची एलआयसी पॉलिसी आहे. याशिवाय भोपाळमध्ये त्याच्या नावावर 600 स्क्वेअर फूटाचा एक प्लॉट आहे. ज्याची बाजारकिंमत 5 लाख रूपये आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रविणकुमारने ही माहिती दिली आहे.
पुढे पाहा, प्रविणची दिल्लीतील प्रचारादरम्यानची छायाचित्रे...