आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पदवी प्रकरणी दिल्लीचे कायदेमंत्री जितेंद्र तोमर यांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अरविंद केजरीवालच्या सरकारमध्ये कायदामंत्री असलेले जितेंद्र तोमर यांचा अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बनावट पदवी सादर केल्याचा आरोप आहे. आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी ट्वीट द्वारे ही माहिती दिली आहे.
कोणत्याही नोटीसशिवाय दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांना अटक करून हौज खास ठाण्यात नेण्यात आले. मोदी सरकार अशा प्रकारे आम आदमी पार्टीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी लावला आहे.
संजय सिंह म्हणाले की, जितेंद्र तोमर यांचे प्रकरण सध्या कोर्टात आहे. कोर्टात विद्यापीठाने प्रतिज्ञापत्राद्वारे तोमर यांची पदवी बनावट नसल्याचेही सांगितले आहे. तरीही केवळ दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे अटक करण्यात आल्याचे सिंह म्हणाले. दिल्ली पोलिस, उपराज्यपाल आणि मोदी सरकार आम्हाला खटले आणि पोलिसांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आमची लढाई सुरुच राहणार असल्याचे, संजय सिंह म्हणाले.

सोमवारी सायंकाळी ठरली योजना
दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील तोमर यांना अटक करण्याची योजना सोमवारी सायंकाळी तयार करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी जितेंद्र तोमर यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सहकार्य केले नाही, त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...