आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Law Minister Jitender Singh Tomar Arrested

बनावट पदवी प्रकरण: कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर - Divya Marathi
दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर
नवी दिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तोमर यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केले.
आरोपी तोमर यांना दिल्ली पोलिसांनी संध्याकाळी साकेत कोर्टात हजर केले. तोमर यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती, त्यावर कोर्टाने तोमर यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला. तोमर यांच्यावर बनावट पदवी सादर केल्याचा आरोप आहे.
कोणत्याही नोटीस न देता दिल्ली पोलिसांनी तोमर यांना अटक केले असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केलेल्या 'ट्वीट'मध्ये म्हटले आहे. मोदी सरकारचा हा आम आदमी पक्षाची बदनामी करण्याचा डाव असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला आहे.

संजय सिंह म्हणाले की, जितेंद्र तोमर यांचे प्रकरण सध्या कोर्टात आहे. कोर्टात विद्यापीठाने प्रतिज्ञापत्राद्वारे तोमर यांची पदवी बनावट नसल्याचेही सांगितले आहे. तरीही केवळ दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे अटक करण्यात आल्याचे सिंह म्हणाले. दिल्ली पोलिस, उपराज्यपाल आणि मोदी सरकार आम्हाला खटले आणि पोलिसांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आमची लढाई सुरुच राहणार असल्याचे, संजय सिंह म्हणाले.

दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील तोमर यांना अटक करण्याची योजना सोमवारी सायंकाळी तयार करण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी जितेंद्र तोमर यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सहकार्य केले नाही, त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा घटने संबंधित फोटो...