आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi LG Questions Appointment Of New DWC Chief Swati Maliwal

आधी उपराज्यपालांवर आरोप, आता म्हणे आयोगातच रचला जातोय कट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नई दिल्ली - महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांच्या नियुक्तीच्या वादात आता एक नवा मुद्दा आला आहे. स्वाती मालिवाल यांनी आता या प्रकरणात महिला आयोगातच काहीतरी कट रचला जात असल्याचा संशय आहे. उपराज्यपालांनी कोणताही फोन केला नसल्याचे सांगूनही नेमप्लेट का हटवण्यात आली असा सवाल मालिवाल यांनी उपस्थित केला आहे.
त्याआधी स्वाती मालीवाल यांना दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्ष नियुक्त करण्यावर नायब राज्यपाल नजीब जंग यांना आक्षेप घेतला होता. मालीवाल यांची नियुक्ती करण्यापूर्वी आपली परवानगी घेण्यात आली नव्हती, असा आक्षेप घेत जंग यांनी त्यांची नियुक्ती रद्द केली आहे.
नायब राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालयास एक पत्र पाठवले असून त्यात ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. पत्रात म्हटले आहे की, घटनेच्या नियम २३९ व २३९ एए अंतर्गत राष्ट्रपतींच्या वतीने नियुक्त केलेले उपराज्यपाल हेच दिल्लीमध्ये सरकार आहेत. वरिष्ठ पदांवरील नियुक्त्यांसह सर्व महत्त्वपूर्ण निर्णयांचा अधिकार नायब राज्यपालांना आहे. मालीवाल यांची नियुक्ती करण्याआधी परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे ही नियुक्ती घटनाबाह्य आहे.

नायब राज्यपालांच्या कार्यालयाने समाजकल्याण विभागाच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावत २८ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे आदेश िदले आहेत. ही नियुक्ती करताना सर्व नियमांचे व प्रक्रियेचे पालन झाले आहे किंवा नाही? जर त्यांचे पालन झाले असेल तर उपराज्यपालांची मंजुरी न घेताच त्यांच्या नावाचा आदेश कसा काय जारी करण्यात आला? अशी विचारणाही कार्यालयाने केली आहे. िदल्ली सरकारने यावर असा युक्तिवाद केला आहे की, महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात नायब राज्यपालांची काहीच भूमिका असत नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती
करताना नायब राज्यपालांची परवानगी घेण्यात आलेली नाही.

केजरीवालांच्या सल्लागार : मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ३० वर्षीय मालीवाल यांची सोमवारी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मालीवाल आपचे नेते नवीन जयहिंद यांच्या पत्नी असून केजरीवाल यांच्या नागरी समस्या प्रकरणांच्या सल्लागार आहेत. मालीवाल या केजरीवाल यांच्या नातेवाईक असल्याचाही आरोप होत आहे.

ने त्यांची नियुक्ती वादात सापडली होतपरंतु मालीवाल यांनी त्याचा इन्कार केला होता.
जंग म्हणाले, ऑफीसला येऊ नका, केजरीवाल म्हणाले नियुक्ती कायम

दरम्यान, महिला अायोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी रात्री टि्वटवर म्हटले, नायब राज्यपालांनी फोन करून उद्यापासून ऑफीस न येण्याविषयी सांगितले आहे. माझ्याकडील फायली परत घेण्यात येत आहेत. महिला आयोगाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र मालीवाल पदावर कायम राहतील असे म्हटले आहे. नायब राज्यपालांच्या कार्यालयाने मात्र, मालीवाल यांना फोन केल्याचे नाकारले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मालीवाल म्हणाल्या... नियुक्तीच्या वेळी चूक झाली