आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभर मोदी लाट असल्याचे पुन्हा सिद्ध झाले - शहा; माकन यांचा राजीनामा, आपमध्ये दुफळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिल्ली प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी राजीनामा दिला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशभर मोदींचे समर्थक वाढत असल्याची प्रतिक्रिया दिली. तर, आम आदमी पक्षाचे खासदार मान यांनी पराभवाचे खापर अरविंद केजरीवाल यांच्यावर फोडले आहे.
 
आम आदमी पक्षात दुफळी
- देशात मोदींची लाट वाढत आहे, असे म्हणणाऱ्या भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आम आदमी पक्षाने प्रत्युत्तर दिले. प्रत्यक्षात ही मोदी लाट नसून ईव्हीएमची लाट आहे अशी खरपूस टीका दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी केली.
- तर दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी पराभवाचे खापर अरविंद केजरीवाल यांच्यावर फोडले. ईव्हीएमवर टीका करण्यापेक्षा पराभवाची जबाबदारी घेऊन अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मान यांनी केली.
 
अजय माकन यांचा राजीनामा
दिल्ली मनपा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अजय माकन यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. महानगर पालिकेत काँग्रेस चांगले प्रदर्शन करेल अशी अपेक्षा होती. मात्र, निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने आपण राजीनामा देत आहोत असे माकन यांनी स्पष्ट केले. 
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले...
- "दिल्लीत तिन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपनेच बाजी मारली आहे. देशात 3 वर्षांपासून मोदी सरकार सत्तेमध्ये आहे. दिल्ली मनपाचे निकाल, देशभर मोदींचे समर्थन वाढत असल्याचा पुरावा आहे."
- "दिल्लीच्या जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे, की येथे नकारात्मकता आणि बहाणे करणाऱ्यांचे राजकारण चालणार नाही. स्पष्ट बहुमत देत दिल्लीकरांनी मोदी सरकारच्या कामकाजावर समाधानाचा शिक्कामोर्तब केला."
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पश्चिम बंगालच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दीनदयाल जनमत शताब्दी अंतर्गत गुरुवारी नक्सलबाडी येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी 3 लाख भाजप कार्यकर्ते पक्षाचा विस्तार करण्याची मोहिम छेडणार आहेत.
 
पुढील स्लाईडवर वाचा... मोदींची प्रतिक्रिया...
 
हेही वाचा
 
 
बातम्या आणखी आहेत...