आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Metro Employees Uploaded Mms Clips On Websites

दिल्‍ली मेट्रोच्‍या कर्मचा-यांनीच केले 'मेट्रो एमएमएस' कांड, लवकरच होणार भंडाफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍ली मेट्रोमध्‍ये जोडप्‍यांचे अश्लिल चाळे पॉर्न वेबसाईटवर टाकण्‍याचा प्रकार खुद्द दिल्‍ली मेट्रोच्‍या सीसीटीव्‍ही मॉनिटरींग रुममधुन झाला होता. दिल्‍ली पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करणा-या दिल्‍ली पोलिसांनी ही बाब स्‍पष्‍ट केली आहे. दिल्‍ली मेट्रोच्‍या मॉनिटरींग रुममधुनच हे एमएमएस रेकॉर्ड करण्‍यात आले आणि तिथल्‍याच कर्मचा-यांनी ते पॉर्न वेबसाईटवर टाकले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दिल्‍ली मेट्रोत जोडप्‍यांचे अश्लिल चाळे रेकॉर्ड करुन पॉर्न वेबसाईटवर टाकण्‍यात आल्‍याचा प्रकार यावर्षी जुलैमध्‍ये उघडक्‍ीस आला होता. जवळपास 250 पेक्षा जास्‍त एमएमएस पॉर्न वेबसाईटवर टाकण्‍यात आले होते. हे एमएमएस दिल्‍ली मेट्रो रेल्‍वेच्‍या सुरक्षेसाठी लावण्‍यात आलेल्‍या सीसीटीव्‍ही कॅमेरातूनच रेकॉर्ड करण्‍यात आले होते. जवळपास दोन लाख लोकांनी हे एमएमएस पाहिले होते. मेट्रोतील सीसीटीव्‍ही फुटेजवर लक्ष ठेवणे आणि सुरक्षित ठेवण्‍याची जबाबदारी सीआयएसएफ आणि डीएमआरसीवर आहे. त्‍यांच्‍याच कर्मचा-यांनी हा प्रकार केला.