आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Metro Phase 7 And 8 Will Have Driverless Trains

राजधानी दिल्लीत लवकरच धावणार चालकारहित मेट्रो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये लवकरच चालकविरहित मेट्रो ट्रेन धावणार आहे. फेज तीनअंतर्गत लाइन सात आणि आठमध्ये ही मेट्रो धावेल. या गाडीला चालक नसेल. तर प्लॅटफॉर्म बेस ट्रेन कंट्रोल सिग्नल सिस्टिम तंत्रावर ती धावली जाईल. यात अनअटेंडंट ट्रेन ऑपरेशन टेक्नॉलॉजी (यूटीव्ही) उपलब्ध असेल. मे 2015 मध्ये ही ट्रेन भारतात येणार आहे. परीक्षणासाठी सुरुवातीला वर्षभर ट्रेनची देखभाल ऑपरेटरच करतील. परंतु नंतर ती चालकाशिवायही धावायला लागेल. नव्या ट्रेनचा लूक हा बुलेट ट्रेनसारखा आकर्षक करण्यात आला असून त्यातील इंटेरियरदेखील खूप आकर्षक असेल.

ट्रेनमध्ये प्रत्येक सीटवर तीन प्रवाशांची बसण्याची व्यवस्था असेल. इंटेरियर डिझाइन बदलामुळे या डब्यातून 40 अतिरिक्त प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येईल. त्यांना आधारासाठी दोन भागांत रॉड तसेच हँडलची सुविधा असेल. लाइन सातवरील मेट्रोच्या सीटचा रंग चॉकलेटी ठेवण्यात आला असून लाइन आठवरील जागांचा रंग गुलाबी ठेवण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी यात 37 इंचांचा डिस्प्ले असून त्यावर प्रवाशांना स्टेशनची व इतर माहिती मिळू शकेल.

द.कोरियाकडून कोच मिळणार
डीएमआरसीने 20 ट्रेनसाठी 120 कोचची मागणी दक्षिण कोरियाकडे नोंदवली आहे. हे कोच 2015 पर्यंत भारतात येतील. फेज तीनमध्ये मेट्रोच्या वेगातही वाढ केली जाईल. सध्या ट्रेनचा वेग ताशी 32 किलोमीटर असून तो वाढवून ताशी 35 किलोमीटर इतका केला जाईल.