आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली मेट्रो स्टेशनवर प्रणयक्रीडेत मग्न जोडप्याच्या क्लिप्स आता पोर्न साईटवर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली मेट्रोमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात अश्लील एमएमएस बनवण्यात येत असल्याचे प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मेट्रो स्टेशनवर असलेल्या दादर्‍याच्या पायर्‍यांवर एक जोडपे चक्क प्रणयक्रीडेत मग्न असल्याचा व्हिडिओ एका पोर्न साईटवर अपलोड झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. यापूर्वी दिल्ली मेट्रोत तरुण- तरुणींचे किसिंग आणि इंटीमेट क्लिप समोर आल्या होत्या.

दिल्ली मेट्रो पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा केला जातो; परंतु याच मेट्रोमध्ये अश्‍लील एमएमएस आणि पॉर्न व्हीडीओ बनवण्यात येत असल्याचे आता उघड झाल्यानंतर दिल्ली मेट्रोचे कॉर्पोरेट प्रबंधक अनुज दयाल यांनी सांगितले, की दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) संबंधित व्हिडिओ क्लिप्स मुख्य संरक्षण आयुक्तांकडे पाठवण्यात आल्या आहेत. यापूर्वी उघडकीस आलेल्या पोर्न व्हिडिओची चौकशी दिल्ली पोलिसांची सायबर गुन्हे शाखा करत आहे.

दयाल यांनी प्रवाशांना यात्रे दरम्यान शिष्टाचार आणि अनुशासन पाळण्याचे आवाहन केले आहे. मेट्रो डब्यातील दोन ते आठ मिनिटांचे जवळपास 250 पेक्षा जास्त व्हिडियो आतापर्यंत पोर्न साईटवर अपलोड करण्‍यात आले आहे.

सायबर शाखेकडे तक्रार नोंदवण्यापूर्वी डीएमआरसीने मेट्रोतील केंद्रीय औद्योगिक संरक्षक दलावर (सीआयएसएफ) सीसीटीव्ही व्हिडिओच्या रेखरेखीत कसूर ठेवल्याचा ठपका ठेवला होता. 'आमची एक निरीक्षण संस्था आहे. व्हिडिओच्या संरक्षणाची जबाबदारी आमची नाही', असे सीआयएसएफने स्पष्ट केले आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, 'पॉर्न साईटवर दिल्ली मेट्रो जोरात'