आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजरीवालांचे हे मंत्री रोज पत्नीच्या पाया पडतात, रॅगिंग करताना झाली भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या टीममध्ये असे अनेक मंत्री आणि आमदार आहेत जे त्यांच्या विधानाने आणि कृत्याने चर्चेत राहिले आहेत. त्यात एक चेहरा असा आहे, जे रोज त्यांच्या पत्नीच्या पाया पडतात. प्रत्येक कामात प्रथम पत्नीचा सल्ला घेतात. यांच्याकडे केजरीवाल यांनी देखील महिला सशक्तीकरणाचे काम दिले आहे. या मंत्र्याचे नाव आहे संदीप कुमार. त्यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खाते आहे.
संदीप आपचे असे मंत्री आहेत, जे रोज पत्नीच्या पाया पडतात. संदीप कॉलेजमध्ये पत्नी रितूचे सीनिअर होते. तेव्हा ज्युनिअर्सची रॅगिंग करताना त्यांची रितूसोबत भेट झाली. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रितू यांनी सांगितले, की लग्नानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण सुरु ठेवले आणि एलएलबी पूर्ण केले. पतीच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते, हे सांगायला त्या विसरल्या नाही. जेव्हा त्यांना पतीच्या पाया पडण्याबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, प्रत्येक करवाचौथला मी पतीच्या पाया पडते. त्या म्हणतात, संदीप महिलांच्या अधिकाराबद्दल अधिक सजग आहेत. महिलांच्या कल्याणासाठी ते अनेक योजनांची अंमलबजावणी करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या कधी आणि कशी झाली होती पहिली भेट
बातम्या आणखी आहेत...