आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : काय आहे दिल्लीच्या 7 इमारतींचा रंजक इतिहास? जाणून घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत दोन लाख चौरस फुटांवर तयार करण्यात आली आहे. - Divya Marathi
फोटो - राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत दोन लाख चौरस फुटांवर तयार करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकींशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे 10 फेब्रुवारीला निकालानंतर स्पष्ट होतील. पण त्याआधी दिल्लीशी संबंधित रंजक बाबींबाबत आम्ही आपल्याला अधिकाधिक माहिती देणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणजे दिल्लीतील ऐतिहासिक इमारतींशी संबंधित रंजक किस्से आज तुम्हाला सांगणार आहोत.
300 कुटुंबांच्या जमिनींचे अधिग्रहण
1911 मध्ये इंग्रजांनी त्यांची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अॅडविन लुट्यंस, रॉबर्ट रसेल आणि हर्बर्ट बेकर यांनी मिळून रायसीना हिल्सला व्हाइसरॉय हाउस, नॉर्थ ब्लॉक, साउथ ब्लॉक आणि संसद तयार करण्यासाटी निवडले. त्यावेळी 4 वर्षांत 300 कुटुंबांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. एकूण 4000 एकराचा विशाल परिसर निवडण्यात आला. भारतीयांचा ओढा मोगलकालीन आणि राजपूत स्थापत्य शैलीकडे होता. पण लुट्यंस यांना नवी दिल्ली युरोपीय शैलीत साकारायची होती. त्यावेळी व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग होते. ते व्हाइसरॉय हाऊस आणि संसद भवन भारतीय शैलीनुसार तयार करण्यावर अडले. त्यांच्या जिद्दीमुळे लुट्यंसला माघार घ्यावी लागली. त्यामुळेच व्हाइसरॉय हाऊस आता राष्ट्रपती भवन म्हणून ओळखले जाते. त्याच्या इमारतींमध्येही मोगल आणि राजपूत शैली आढळते.

29 हजार मजुरांनी तयार केला परिसर
व्हाइसरॉय हाऊस तयार होण्यास 1912 मध्ये सुरुवात झाली. 1939 मध्ये ते तयार झाले. ते तयार करण्यासाठी 17 वर्षे आणि 14 कोटी रुपये लागले. व्हाइसरॉय हाऊसची मुख्य इमारत दोन लाख चौरसफूट परिसरात तयार करण्याचा निर्णय झाला. सुमारे 340 खोल्या तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. धौलपूर, भरतपूर आणि आगरा येथून दगड आणण्यास सुरुवात झाली. त्यासाठी रायसीना हिल्सपर्यंत तात्पुरती रेल्वे सुरू करण्यात आली. 29 हजार मजूर बोलावण्यात आले. एखूण 30 लाख क्यूबिक फूट दगड आणले. त्यापासून 70 लाखांपेक्षा अधिक वीटा तयार करण्यात आल्या. राष्ट्रपती भवनाचा समोरचा भाग खुशवंत सिंह यांचे आजोबा सुजान सिंह आणि वडील शोभा सिंह यानी तयार केला होता. सुजान सिंह त्यावेळी अर्ध्या दिल्लीचे मालक होते.

सुरक्षिततेसाठी तयार केल्या होत्या 300 हून अधिक खोल्या
व्हाइसरॉय हाऊसमध्ये सुरक्षित राहता यावे म्हणून आत 300 हून अधिक खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यामागे एक रंजक कथा सांगितली जाते. व्हाइसरॉय हाऊस लॉर्ड हार्डिंगच्या देखरेखित तयार होण्यास सुरुवात झाली होती. ते लुट्यंसला म्हणाले होते की, आत अशी व्यवस्था असावी की, 1857 सारखी क्रांती झाल्यास इंग्रजांचे सर्व वरिष्ठ अधिकारी कुटुबासह आत सुरक्षित राहू शकतील. त्यामुळेच सैन्याची एक तुकडी आत तैनात असायची. तसेच 300 हून अधिक खोल्याही त्यासाठीच तयार करण्यात आल्या होत्या.

राष्ट्रपती भवनाचे रुग्णालय बनवावे अशी महात्मा गांधीची इच्छा होती
स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींची अशी इच्छा होती की, व्हाइसरॉय हाऊस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका मोठ्या रुग्णालयात स्थलांतरीत केले जावे. त्यावेळी अखेरचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन तीन मूर्ती येथील निवासात जाण्यास तयारही झाले होते. पण जवाहरलाल नेहरूंना हा प्रस्ताव मान्य नव्हता असे म्हटले जाते. स्वातंत्र्यानंतर येथे परदेशातील राष्ट्रप्रमुखांची थाटात राहण्याची सोय करता यावी अशी त्यांची इच्छा होती.

पुढे वाचा, लाल किल्ल्याच्या भींतींचा खरा रंग कसा होता?
अखेरच्या स्लाइडवर, वाचा दिल्लीसंदर्भातील व्हिडिओ...