आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात सापडला पहिला इबोला रुग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले - 'घाबरायचे काम नाही'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात इबोलाचा पहिला रुग्ण सापडला आहे. लायबेरियाहून परतलेल्या एका भारतीयाला इबोला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला दिल्ली विमानतळावर स्पेशल फॅसिलिटीमध्ये इतर प्रवाशांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लायबेरियाहून परतलेला 26 वर्षांचा युवक 10 नोव्हेंबर रोजी भारतात परतला होता. तेव्हा त्याच्यात इबोलाची लक्षणे नव्हती. मात्र, जेव्हा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्याच्यात इबोला व्हायरस अढळून आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तो लायबेरियात असताना इबोलाची औषधे घेत होता. इबोलाचे हे देशातील पहिले प्रकरण आहे. याआधी इबोला संक्रमण झालेले संशयीत रुग्ण आढळले होते.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे, की या युवकाच्या शुक्राणूंमध्येही इबोला व्हायरस सापडला आहे. यामुळे उपचारांच्या 90 दिवसांनंतरही त्याने शारीरिक संबंध ठेवले तर त्याच्या पार्टनरमध्ये याचे संक्रमण होऊ शकतो. तो पूर्ण पणे बरा होत नाही तोपर्यंत त्याला दिल्ली विमानतळाच्या आरोग्य विभागाच्या विशेष केंद्रात ठेवले जाणार आहे.
लायबेरिया सरकारने दिले होते मेडिकल क्लिअरन्स
ज्या युवकाला इबोला असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्याला लायबेरिया सरकारने तो इबोला मुक्त असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्या प्रमाणपत्रात म्हटले आहे, त्याचा उपचार पूर्ण झाला आहे. आता त्याच्यामध्ये इबोला व्हायरस नाही. त्याच्या रक्ताच्या लायबेरियात तीन चाचण्या घेण्यात आल्या, त्यात त्याला इबोला नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे, की त्यात इबोला आढळण्याचे कारण हे व्हायरस मुत्राशय आणि वीर्यात अनेक दिवस सक्रिय राहातात.
21 दिवसांमध्ये होते संक्रमण
कोठून आला इबोला - इबोलाचे संक्रमण नक्की कुठून झाले याचा डॉक्टरांना अद्याप शोध लागलेला नाही. एका अभ्यासानुसार, माकड, वराह (डुक्कर) आणि वटवाघूळात ते सापडल्याचे सांगितले जाते.
संक्रमणापासून लक्षणापर्यंत - हा व्हायरस शरीरात पसरण्यासाठी दोन ते 21 दिवस लागतात. जेव्हा याची लक्षणे आढळून येतात तेव्हा रुग्ण हा आजार पसरवण्याच्या स्थितीत पोहोचलेला असतो. त्याचे पुढील 12 दिवस अतिशय संवेदनशील असतात.
यापासून कसे दूर राहाल - इबोला पीडित रुग्णाने कोणत्याही प्राण्यापासून दूर राहिले पाहिजे.
हात रोज स्वच्छ केले पाहिजे.
हातमोजे आणि अॅप्रॉन परिधान करुनच इबोला रुग्नाजवळ जावे.
इबोला संक्रमीत मांस खाणे टाळावे.