आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत ट्रॅफिक जाममध्ये गडकरी दोन तास अडकले, तातडीने घेतली अधिकाऱ्यांची बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमधील वाहतुकीच्या कोंडीची समस्या किती गंभीर आहे याची अनुभूती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सोमवारी स्वत:च ट्रॅफिक जाममध्ये दोन तास अडकून पडल्यानंतर आली. गडकरी यांनी स्वत:च ही माहिती दिली.

स्वत:च अडकून पडावे लागल्यामुळे दिल्लीकरांचे दररोज काय हाल होत असतील, याची कल्पना आल्याने गडकरी प्रचंड नाराज झाले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. वाहतुकीच्या कोंडीवर कसा मार्ग काढता येईल याबाबत चर्चा केली. केंद्र सरकारतर्फे दिल्ली सरकारसोबत मिळून दिल्लीतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर मार्ग काढण्यात येईल. पुढील दीड वर्षांत वाहतुकीच्या कोंडीची समस्या अर्ध्यावर आलेली असेल, असे गडकरी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...