आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीवर धुक्याची चादर; 13 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उड्डाणे लेट, 100 पेक्षा जास्त रेल्वेंवर परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर भारतात पसरलेल्या दाट धुक्यामुळे दिल्ली, एनसीआरसह अनेक भागातील रेल्वे आणि फ्लाइट्सवर परिणाम झाला आहे. बुधवारी व्हिजिबिलीटी कमी झाल्यामुळे 8 आंतरराष्ट्रीय आणि 5 देशांतर्गत उड्डाणांवर परिणाम झाला आहे. 3 आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स डायव्हर्ट करण्यात आले आहेत. दाट धुक्यामुळे 100 हुन अधिक रेल्वेंवर परिणाम झाला आहे. 81 रेल्वे लेट झाल्या आहेत. 21 रेल्वेंचा वेळ बदलण्यात आला आहे. 3 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने सांगितले आहे, की डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही धुके असण्याची शक्यता आहे.
- एएनआयच्या वृत्तानुसार, दाट धुक्यामुळे आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सला उशिर झाला आहे. याचा परिणाम बगदाद-दिल्‍ली व्हाया लंडन, अबू धाबी-दिल्‍ली, मस्‍कत-दिल्‍ली व्हाया जयपुर, दुबई-दिल्‍ली व्हाया जयपुर, कुवैत-दिल्‍ली, अदीस अबाबा-दिल्‍ली, फ्रँकफोर्ट -दिल्‍ली, बर्मिंगहम-दिल्‍ली यांचा समावेश आहे.
- देशांतर्गत विमानांमध्ये हैदराबाद-दिल्ली, अहमदाबाद-दिल्ली, अमृतसर-दिल्ली, डेहरादून-दिल्ली, जयपूर-दिल्ली, लखनऊ-दिल्ली, बंगळुरु-दिल्ली आणि मुंबई-दिल्ली यांचा समावेश आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...