आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम-विषम मोहिमेमुळे दिल्लीत रस्त्यांवर १० लाख वाहने कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्या एक जानेवारीपासून सम - विषम योजना लागू झाल्यानंतर दिल्लीतील रस्त्यांवर जवळपास दहा लाख वाहने कमी होतील. त्यामुळे राजधानीतील प्रदूषणाच्या पातळीत मोठी घट होईल, असा अंदाज आहे.

नवीन वर्षापासून राजधानी िदल्लीत खासगी वाहने रस्त्यावर आणण्यासाठी सम-विषम क्रमांकांच्या पर्याय स्वीकारण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. दिल्लीत सध्या १९ लाखांपेक्षा चारचाकी वाहनांची नोंदणी आहे. त्यात कार, जीप, व्हॅन आदींचा समावेश आहे. सम- विषम योजना लागू झाल्यानंतर त्यापैकी निम्मीच वाहने रोजच्या ऐवजी एकदिवसाआड चालू शकतील. राजधानीतील प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते. त्यानंतर सरकारने वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला होता. त्याविरोधात काहीजणांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु त्याला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला होता.परंतु त्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. केजरीवाल सरकारने सुरुवातील केवळ १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील अडचणी लक्षात घेऊन त्यात बदल केले जातील िकंवा नागरिकांना फार त्रास झाला तर योजना स्थगित केली जाऊ शकते, असे सरकारने म्हटले आहे. त्याची तपशीलवार योजना सरकार नंतर जाहीर करणार आहे.
पायलट प्रकल्पाअंतर्गत दिल्लीत अशा स्वरुपाच्या १५ बसेस चालवण्याची सरकारची योजना असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. प्रदूषणाचा मुद्दा सरकारसाठीही चिंताजनक असून दिल्लीशी संबंधित या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील. केवळ दिल्लीतीलच नव्हे तर देशातील प्रदूषणाला आळा घालणे हा सरकारचा उद्देश आहे, असेही ते म्हणाले.
१०हजार नवे ऑटो परमीट : दिल्लीसरकारने सम - विषम योजनेअंतर्गत सार्वजनिक परिवहन यंत्रणा मजबूत करण्यासाठी १० हजार नव्या ऑटोरिक्षांना परमीट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राजधानीत ८० हजार ऑटो रिक्षा चालतात. या शिवाय ६,००० अतिरिक्त बसेसदेखील चालवल्या जाणार आहेत.
ट्रक,रस्त्यावरील धुळीमुळे प्रदूषण: आयआयटीकानपूरने यासंदर्भात एक अहवाल जारी केला असून त्यात दिल्लीतील प्रदूषणासाठी ट्रकमधून बाहेर पडणारा धूर रस्त्यावरील धूळ जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार हिवाळ्यात रस्त्यांवर धुळीचे प्रदूषण कमी होते. परंतु उन्हाळ्यात ते धोक्याच्या पातळीपर्यंत वाढते. याउलट हिवाळ्यात इतर गाड्यांमधून सोडला जाणाऱ्या धुराने प्रदूषण गंभीर प्रमाणात वाढते.
याबाबत आप सरकारदेखील एक अहवाल जारी करणार आहे.
मोदी खासदारांसाठी दोन इलेक्ट्रिक बसेस देणार
दिल्लीतीलवाढत्या प्रदूषणावर व्यापक चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विजेवर चालणाऱ्या दोन बसेस खासदारांना प्रदान करणार आहेत. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याच्या त्यांच्या भूमिकेला मदत मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री िनतीन गडकरी यांनी तसे संकेत दिले आहेत. जर सर्व काही पूर्वनियोजनानुसार झाले तर पंतप्रधान २१ डिसेंबर रोजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना दोन इलेक्ट्रिक बसेस हस्तांतरीत करतील. त्याचा वापर खासदारांना संसदेत, कार्यालयात ने- आण करण्यासाठी तसेच राजधानीत फिरण्यासाठी होऊ शकतो. या बसेसची बॅटरी लिथियम - आयर्न चलित असून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) त्याची निर्मिती केली आहे.
बातम्या आणखी आहेत...