आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Officer Touches L G’S Feet At Event, Triggers Controversy

उपराज्यपालांसमोर IAS अधिकारी नतमस्तक; म्हणाला, त्यात गैर असे काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली सरकारच्या एका आएएस अधिकार्‍याने एका कार्यक्रमात उपराज्यपाल नजीब जंग यांना चरणस्पर्श केल्याची घडना घडली. यावरून वाद उफाळून आल्यानंतर या अधिकार्‍याने प्रतिक्रियाही दिली आहे. 'त्यात गैर असे काय?' असा उलट सवाल करत चरणस्पर्श करणे हे वरिष्ठांचा सम्मान करण्यासारखे असल्याचेही या अधिकार्‍याने म्हटले आहे.

कोणता अधिकारी झाला नतमस्तक...?
-‘द हिंदु'च्या एका रिपोर्टनुसार, दानिक्स (दिल्ली, अंडमान निकोबार आयलंड्स सिव्हिल सर्व्हिसिस) च्या 1993 बॅचचे अधिकारी विश्व मोहन यांनी दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांच्या पाया पडल्या.
- विश्व मोहन सध्या दिल्ली डेव्हलपमेंट्‍स अथॉरिटीजच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहे.

काय आहे प्रकरण?
- सोमवारी ऑफिस ऑफ चीफ इलेक्ट्रोल ऑफिसर (सीईओ) तर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
- इलेक्शनदरम्यान उत्कृष्‍ठ कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांना सम्मानित करण्‍यात आले.
- स्पेशल अवार्डसाठी तीन अधिकार्‍यांची निवड करण्‍यात आली. त्यात विश्व मोहन यांचा समावेश होता.
- कार्यक्रमात एकूण 25 ऑफिशल्स, डिपार्टमेंट व जर्नलिस्टसला पुरस्कार प्रदान करण्‍यात आले.
- पुरस्कार स्विकारताना विश्व मोहन यांनी नजीब जंग यांना वाकून नमस्कार केला.
- विश्व मोंहन यांनी असे केल्यावरून वाद निर्माण झाला. त्यावर मोहन म्हणाले, जंग यांच्या ऐवजी दुसरी कोणी असते. तरी आपण हेच केले असते. 'त्यात गैर असे काय?' असा उलट सवाल करत चरणस्पर्श करणे हे वरिष्ठांचा सम्मान करण्यासारखे असल्याचेही मोहन यांनी सांगितले.

31 डिसेंबरला आयएएस अधिकार्‍यांनी घेतली सामुहिक सुटी
दरम्यान, गेल्या 31 डिसेंबर 2015 ला दानिक्स ऑफिसर्स असोसिएशन व एजीएमयूटी (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम, युनियन टेरेटरीज) कॅडर आयएएस असोसिएशनच्या मेंबर्स सामूहिक सुटीवर गेले होते.
-दिल्लीत सत्तेत असलेल्या 'आप' सरकारने कॅडर आयएएस असोसिएशनच्या दोन मेंबर्सला सस्पेंड केले होते. त्यानंतर असोसिएशनने हे पाऊल उचलले होते.
-मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावर प्रतिक्रिया देताना दानिक्स व आयएएस असोसिएशनला भाजपची 'बी टीम' म्हणून संबोधले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराज्यपाल जंग यांच्या इशार्‍यावर आयएएस अधिकारी काम करत असल्याची टीका करत आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, घटनेशी संबंधित फोटो...