आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; लश्करचे 20-21 दहशतवादी देशात घुसले - पोलिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - लष्कर-ए-तोएबाचे 20-21 दहशतवादी देशात घुसल्याची माहिती आहे. गुप्तचर संस्थांनी महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि पजांब येथील प्रमुख धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्यांची भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे, मुंबई आणि दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 
बाजारपेठा, धार्मिक स्थळ, रेल्वेस्टेशनवर चोख बंदोबस्त
- पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लश्कर ए-तोयबाचे 20 ते 21 दहशतवादी देशात घुसले आहेत. या दहशतवाद्यांकडून मुंबई, दिल्ली, राजस्थान आणि पंजाबात दहशतवादी हल्ल्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पत्रक जाहीर केले आहे. यात स्थानिक पोलीस मेट्रो पोलीस आणि रेल्वे युनिट्सला सतर्क करण्यात आले आहे. बाजारपेठा, धार्मिक स्थळे, मॉल, मेट्रो स्टेशन आणि रेल्वे स्टेशनवर चोख सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 
- मुंबई, नवी दिल्ली आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावे. कुठल्याही अनोळखी वस्तू, संशयित व्यक्तींची माहिती तत्काळ स्थानिक पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
मॉक ड्रिल करण्याचे निर्देश
- दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मॉक ड्रिल घेण्यास सांगण्यात आले आहे. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. दिल्ली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे असेही ते म्हणाले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...