आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Once Again Moving; Bullet Firing In Home On Lady

दिल्ली पुन्हा हादरली ; घरात घुसून तरुणीवर गोळ्या झाडल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बारावीत शिकणा-या किशोरवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर एका तरुणाने गोळी झाडल्याची घटना शुक्रवारी राजधानीत घडली. दक्षिण दिल्लीतील या घटनेतील हल्लेखोर मुलीचा दूरचा नातेवाईक होता, अशी माहिती हाती आली आहे. मुलीचे घर मुनीरका भागात आहे. घरात घुसल्यानंतर हल्लेखोर मुलीच्या खोलीत शिरला आणि तिच्यावर गोळ्या झाडल्या. मृत मुलीचे नाव पिंकी (18) असे होते. ती आर. के. पुरम सेक्टर 5 शाळेतील विद्यार्थिनी होती. गोळी झाडल्याबरोबर तरुण फरार झाला.त्याचे नाव पोलिसांनी जाहिर केले नाही. पिंकीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हत्येमागे नातेवाइकाचा हात असावा, असा संशय पिंकीच्या वडिलांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पिंकी 13 वर्षांची असल्यापासून तो माझ्या मुलीशी विवाह करण्यासाठी मागे लागला होता. असे तरुणीच्या वडिलांनी सांगितले.